Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदित्य नारायण, नेहा कक्करच्या लग्नाचा व्हिडिओ लीक; पण.....

पण, आदित्य हे काय म्हणतोय....? 

आदित्य नारायण, नेहा कक्करच्या लग्नाचा व्हिडिओ लीक; पण.....

मुंबई : एका रिऍलिटी शोच्या मंचाव रुन सुरु झालेली आदित्य नारायण आणि गायिका नेहा कक्कर हिची प्रेमकहाणी लग्नाच्या टप्प्यावर पोहोचल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. किंबहुना त्यांच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचंही म्हटलं गेलं. आता तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये आदित्य आणि नेहा हे वधू- वराच्या वेशात दिसत आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ते एकमेकांना हारही घालताना दिसत आहेत. सेलिब्रिटी पाहुणे मंडळी, रिऍलिटी शोचा मंच आणि मंत्रोच्चारण करणारे भटजी असं एकंदर चित्र या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहता प्रथनदर्शनी तो नेहा आणि आदित्यच्या खऱ्याखुऱ्या विवाहसोहळ्यातीलच असल्याचं भासत आहे. 

लग्नाविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा आणि चाहत्यांमध्ये असणारं कुतूहल पाहता खुदद् आदित्य नारायणने एक मोठा खुलासा केला आहे. नेहा कक्कर आणि आपण विवाहबंधनात अडकत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. 'आयबी टाईम्स'शी संवाद साधताना त्याने याविषयीची माहिती दिली. 

'माझ्या जीवनातील इतका मोठ्या निर्णयाविषयी मी स्वत:च सर्वांना नाही का सांगणार? लग्न करणार असल्याची ही एक मोठी बातमी आहे. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. इथे झालं असं की मतामस्करीत सुरु झालेल्या एका गोष्टीकडे इतक्या गांभीर्याने पाहिलं गेलं की गोष्टी आमच्या आवाक्याबाहेर गेल्या', असं आदित्य म्हणाला. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या सर्व चर्चा खोट्या असल्याचं त्याने सांगितलं.

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

सध्याच्या घडीला कार्यक्रमात जे सुरु आहे, ते रिऍलिटी शोचा एक भाग असल्याचं आदित्यने स्पष्ट केलं. निर्मात्यांकडून आपल्याला जे सांगण्यात आलं, तेच आम्ही केलं असंही त्याने स्पष्ट केलं. तेव्हा आता आदित्य आणि नेहाचं खऱ्या जीवनात लग्न होत नसल्याचीच बाब स्पष्ट होत आहे. 

 

Read More