Marathi News> मनोरंजन
Advertisement

Singer KK Wife: पतीच्या निधनानंतर एकटी पडलेली KK ची पत्नी करते तरी काय, प्रसिद्धीपासून दूर का?

अशा या गायकाच्या निधनानंतर त्याचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात आलं.   

Singer KK Wife: पतीच्या निधनानंतर एकटी पडलेली KK ची पत्नी करते तरी काय, प्रसिद्धीपासून दूर का?

मुंबई : वयाच्या 53 व्या वर्षी कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच सर्वांचा लाडका गायक केके यानं जगाचा निरोप घेतला. केकेच्या निधनानं सर्वजण हादरले मुळात केकेला अगदी हक्कानं सर्वजण एकेरीतच हाक मारत आहेत. कारण, प्रत्येकासाठीच तो अगदी जवळचा. 

प्रेम, मैत्री, बालपण अशा प्रत्येक टप्प्यात त्याच्या गाण्यांची आणि नकळतच त्याचीही आपल्याला साथ होती. अशा या गायकाच्या निधनानंतर त्याचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात आलं. 

केकेचं कुटुंब कायमच प्रकाशझोतापासून दूर होतं. त्याची जोडीदार निधनानंतर पहिल्यांदाच चर्चेत आली. केकेची पत्नी आधीपासूनच या झगमगाटापासून दूर होती. इयत्ता सहावीपासून केकेनं जिच्यावर प्रेम केलं त्याच ज्योतीशी त्यानं लग्नंही केलं. 

1991 मध्ये केकेनं ज्योती कृष्णा (Jyothy Krishna) हिच्याशी लग्न केलं. केकेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं. तमारा आणि नकुल अशी त्यांच्या मुलांची नावं. 

fallbacks

fallbacks

केकेची पत्नी एक आर्टीस्ट आहे. तिला चित्रकलेची विशेष आवड. कलाप्रेमींसाठी तिची चित्र म्हणजे परवणीच. 

fallbacks

fallbacks

fallbacks

अशा या पत्नी आणि मुलांचा परिवार केके मागे टाकून गेलाय खरा. पण, त्यांना या आघातातून सावरण्यास वेळ जाणार हे मात्र नाकारता येत नाही. 

 

Read More