Marathi News> मनोरंजन
Advertisement

विमानाचा संपूर्ण बिझनेस क्लास बुक करून मिका झाला ट्रोल

वेगळं करायचं म्हणून काहीतरी करायचं आणि सोशल मीडियावर ट्रोल व्हायचं... हे तर अनेकांसोबत घडतं... आता असंच घडतंय बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत... सेलिब्रिटिजनं आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला फॉलो करावं म्हणून मिका सिंगनं एक ढिनचॅक युक्ती शोधून काढली... पण, या युक्तीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झालाय. 

विमानाचा संपूर्ण बिझनेस क्लास बुक करून मिका झाला ट्रोल

मुंबई : वेगळं करायचं म्हणून काहीतरी करायचं आणि सोशल मीडियावर ट्रोल व्हायचं... हे तर अनेकांसोबत घडतं... आता असंच घडतंय बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत... सेलिब्रिटिजनं आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला फॉलो करावं म्हणून मिका सिंगनं एक ढिनचॅक युक्ती शोधून काढली... पण, या युक्तीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झालाय. 

त्याचं झालं असं की मिका सिंग नुकताच दुबईला गेला होता. यावेळी त्यानं ज्या फ्लाईटचं बुकिंग केलं होतं त्यातला संपूर्ण बिझनेस क्लासचा कंपार्टमेंटच त्यानं बुक केला... 'मजा' म्हणून आपण हा कंपार्टमेंट बुक केल्याचं त्यानं सोशल मीडियावर म्हटलं... असं केल्यानं सेलिब्रिटिही आता आपल्याला फॉलो करू लागतील, असंही त्यानं आपल्या सोशल मीडियात शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलंय. 

मग काय सोशल मीडियाच तो... लगेचच प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या... मिकाला 'पैशांचा माज' असल्याचंही काहींनी म्हटलं... तर काहींनी त्याला पैसे वाचवण्याचा फुकटचा सल्लाही देऊन टाकला.

इतकंच नाही तर गायक शाननंदेखील एक पोस्ट करत मिका सिंहला 'शाल-जोड्यातून' हाणलं... 'मी आणि माझं कुटुंब जिथं जातं तिथं आम्हाला कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून संपूर्ण बॉलिंग एली बुक करतो... आम्ही मिका सिंहला फॉलो करतोय...' असं म्हणत शाननं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.  

Read More