Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रतिकसोबत जवळीक साधणं विवाहीत नेहाला पडलं महागात?

'संडे का वार'च्या एपिसोडमध्ये, करण जोहर नेहा आणि प्रतीकला चिडवताना दिसला 

प्रतिकसोबत जवळीक साधणं विवाहीत नेहाला पडलं महागात?

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी'मध्ये नेहा भसीन बऱ्याच वेळापासून चर्चेत आहे. नेहाची त्याच्यासोबत असलेली जवळीक खूपच वाढत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण आता नेहा भसीन तिच्या स्वतःच्या या कृतीमध्ये घाबरत आहे. त्यांना वाटतं आहे की, या सर्व गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या निर्माण करु शकतात. 

नेहाला सतावतेय भीती

'संडे का वार'च्या एपिसोडमध्ये, करण जोहर नेहा आणि प्रतीकला चिडवताना दिसला आणि तिच्यातील नातेसंबंधाबद्दल तिला प्रश्नही विचारले. त्यावेळी दोघांनी अगदी औपचारिक उत्तर दिले. पण यानंतर नेहा प्रतीकसोबत तिच्या वाढत्या जवळीकबद्दल बोलताना दिसली.

नेहाने प्रतिकला सांगितले की, बाहेर लोक काय विचार करत असावा याबद्दल तिला खात्री नाही. तथापि, तिने असेही म्हटले की तिच्या कुटुंबाने प्रतीकसोबतचे तिचं कनेक्शन समजून घ्यावं. नेहा प्रतीकलासांगत होती की ती विवाहित आहे, त्यामुळे लोक त्यांचे नाते वेगळ्या पद्धतीने पाहतील, तर शमिता आणि राकेश दोघेही अविवाहित आहेत.

मिलिंदला सोडण्याचे सांगितली कारण 
नेहा पुढे म्हणाली की तिने मिलिंद गाबाला सोडले कारण तिला वाटले की दोघांमध्ये काही संबंध नाही. ती मिलिंद सोबत असती तर ती बिग बॉसच्या घराबाहेर पडली असती, पण तिने कनेक्शन बदलले आणि प्रतीकसोबत तिची जवळीक वाढत आहे. जे शोसाठी चांगले आहे पण ही जवळीक त्यांचे वैवाहिक आयुष्य खराब करू शकते.

Read More