Marathi News> मनोरंजन
Advertisement

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे खास क्षण व्हायरल

Rohit Raut and Juilee Joglekar Wedding : प्रसिध्द गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहे. 

 रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे खास क्षण व्हायरल

Rohit Raut and Juilee Joglekar Wedding : प्रसिध्द गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाआधीच्या विविध विधी सुरु होत्या. 

काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला. नुकतेच रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते, त्यानंतर आता त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले. सोशल मीडियावर फक्त याच जोडीची चर्चा पाहायला मिळत आहे.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नाची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. आता दोघांच्या लग्नाचे खास क्षण समोर आले आहेत. लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी या लग्नाला हजर असल्याचं दिसून आलं.

गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. लिटील चॅम्प्स पंचरत्नांपैकी एक अशी रोहितची ओळख महाराष्ट्रभर आहे. तर जुईली देखील उत्तम गायिका आहे. दोघेही रिअलिटी शोमध्ये गाताना दिसतात. 

 

 

Read More