Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जय मल्हार'मधील खंडेराया जॉन अब्राहमसोबत रुपेरी पडद्यावर

'जय मल्हार' मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे आता बॉलिवूडमध्ये.

'जय मल्हार'मधील खंडेराया जॉन अब्राहमसोबत रुपेरी पडद्यावर

मुंबई : 'जय मल्हार' मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. देवदत्त लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हिंदी सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'सत्यमेव जयते' या आगामी सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

अभिनेता जॉन अब्राहमचा हा सिनेमा असून नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतो आहे. या सिनेमातून देवदत्त खलनायक म्हणून रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. देवदत्तसह या सिनेमात आणखी एक चर्चेतला मराठमोळा चेहरा पाहायला मिळणार आहे. 

तसेच अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जॉन अब्राहमने या सिनेमात भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. यात वन मॅन, वन नेशन अशी टॅग लाईन आहे. जॉनसोबतच यामध्ये मनोज वाजपेयी आणि आयशा शर्मा यांच्याही भूमिका आहेत. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. 

Read More