Marathi News> मनोरंजन
Advertisement

'लग्न मोडलं अन् करिअर खराब...'; डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचा 20 वर्षानंतर बदलला लूक...

Kalyug Actress : 'कलयुग' या चित्रपटात दिसलेल्या आलिया भट्टच्या चुलत बहिणीची आता अवस्था कशी आहे एकदा पाहा...

'लग्न मोडलं अन् करिअर खराब...'; डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचा 20 वर्षानंतर बदलला लूक...

Kalyug Actress : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून लोकप्रियता मिळवली. दरम्यान, त्यांच्यापैकी अनेकांच हे यश फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर त्या पडद्यापासून अशा लांब गेल्या की पुन्हा दिसल्याच नाहीत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे स्मायली सूरी. स्मायली सूरीनं 2005 साली आलेल्या 'कलयुग' या चित्रपटातून कुणाल खेमू आणि इमरान हाश्मी यांच्या सोबत महत्त्वाची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्या चित्रपटातल्या तिच्या साधेपणामुळे तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संघर्ष आणि गंभीर आजारामुळे तिनं चित्रपटसृष्टीपासून काहीसं अंतर घेतलं.

स्मायली सूरीचा बदललेला लुक तिला ओळखणंही झालं कठीण

स्मायलीनं अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. ज्यात ती वेस्टर्न कपड्यांमध्ये आणि नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसली. तिचे रंगवलेले केस आणि बँग्स हेअरकटमुळे तिचा लूक इतका बदललेला आहे की ओळखणंही अवघड जातंय.  

आलिया भट्टशी खास नातं

खूप कमी लोकांना माहिती असेल की स्मायली सूरीचं आणि आलिया भट्टचं खास नातं आहे. ती आलिया भट्ट, इमरान हाश्मी आणि मोहित सूरी यांची चुलत बहिण आहे. इतक्या मोठ्या फिल्मी कुटुंबातून असूनही स्मायलीचं करिअर फार पुढं जाऊ शकलं नाही.

आजार आणि डिप्रेशनमुळे मागे राहिलं करिअर

स्मायली सूरी हिच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तिचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी मुंबईत झाला. स्मायली सूरीनं 'कलयुग'मध्ये रेणुका नावाच्या एका निरागस मुलीची भूमिका साकारली होती. 'क्रूक', 'क्रॅकर्स', 'यह मेरा दिल', 'तीसरी आंख' अशा काही चित्रपटांमध्ये ती दिसली. 2015 मध्ये ती 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. इतकंच नाही तर घटस्फोटानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली आणि मग तिला चित्रपटसुद्धा मिळेनासे झाले. पण तिनं हार मानली नाही. डिप्रेशनवर मात करत तिनं स्वतःला पुन्हा उभं केलं आणि आता ती डान्सच्या माध्यमातून स्वतःला सावरते.

Read More