Marathi News> मनोरंजन
Advertisement

भर मैदानात सोहा पडली अन्...

सोहाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल...

भर मैदानात सोहा पडली अन्...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खानचा (Soha Ali Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होणारा व्हिडिओ हा सोहा भर मैदानात पडल्याचा हा आहे. सोहाच्या मुलीच्या, इनाया नौमी खेमू हिच्या शाळेमध्ये रस्सीखेचचा खेळ खेळला जात होता. त्यावेळी खेळादरम्यानच सोहा मैदानात पडली. सोहाचा हा पडल्याचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

इनायाच्या शाळेत स्पोर्ट्स डे साजरा करण्यात येत होता. याच कार्यक्रमासाठी सोहा इनायाच्या शाळेत पोहचली होती. त्यावेळी पडल्याचा व्हिडिओ सोहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक जण प्रतिक्रिया देत असून सोहाचं कौतुक करतायेत. तर काही तर तिची खिल्लीही उडवताना दिसतात.

या व्हिडिओमध्ये सोहा शाळेतील मुलांच्या पालकांसोबत रस्सीखेचचा खेळ खेळताना दिसतेय. पण, सोहाची टीम या खेळात हरते. दुसऱ्या टीमने संपूर्ण ताकद लावत रस्सी खेचली आणि त्याचवेळी सोहा खाली पडली.

या व्हिडिओमध्ये सोहाने, एक पालक म्हणून माझा पहिला स्पोर्ट्स डे असल्याचं सांगितलं. रस्सीखेचमध्ये थोड्याशा चुकीने हरले. सर्वात उत्तम स्पोर्ट्सडेचं आयोजन केल्याबद्दल तिने संबंधितांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 
A post shared by Soha (@sakpataudi) on

Read More