Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या कुटूंबात आणखी एक घटस्फोट; अरबाजनंतर कोणाचा नंबर

 ही बातमी कळताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सलमानच्या कुटूंबात आणखी एक घटस्फोट; अरबाजनंतर कोणाचा नंबर

मुंबई : सोहेल खान आणि सीमा खान यांचा घटस्फोट होत आहे.  ही बातमी कळताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलमान खानच्या कुटुंबात आणखी एक नातं तुटलं आणि ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. सीमा आणि सोहेलच्या लग्नाला 24 वर्षे झाली होती. दोघांनी लव्हमॅरेज केलं होतं. असं असूनही त्यांच्या नात्यात काय कमतरता होती की ते वेगळे होणार आहेत. खरं तर, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला तेव्हापासूनच याची सुरुवात झाली होती.

सीमा आणि सोहेल 2017 पासून वेगळे राहत आहेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोहेल खान आणि सीमा खानचं नातं औपचारिकरित्या संपुष्टात येणार आहे. पण हे नातं 2017 मध्येच तुटलं. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा त्याच वर्षी घटस्फोट झाला. त्यांच्याही लग्नाला 18 वर्षे झाली होती. पण तरीही दोघांनीही एकत्र न राहण्याचा निर्णय त्यांच्या संमतीने घेतला. असं म्हटलं जातं की, कुटुंबातील हे नातं तुटल्यानंतर सोहेल आणि सीमाही वेगळे झाले. दोघंही वेगळे राहू लागले होते. आणि तेव्हापासून त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या.

कोणत्याही वादाशिवाय झाले वेगळे
आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यात कोणताही वाद नं झाल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, ते केवळ परस्पर संमतीने वेगळे होत आहेत. दोघांमध्ये कोणतंही भांडण किंवा वाद नाही. त्याचबरोबर, या नात्याच्या तुटण्याचं जेवढं चाहत्यांना आश्चर्य वाटतंय, तितकंच हे नातं जुळणं आश्चर्यकारक होतं कारण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं.

fallbacks

सीमाच्या घरच्यांना हे नातं वेगळ्या धर्मामुळे मान्य नव्हतं. पण दोघंही एकमेकांवर इतकं प्रेम करत होते की, या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. आता २४ वर्षांनंतर हे नातं संपुष्टात आलं आहे.

Read More