Marathi News> मनोरंजन
Advertisement

एका कारणामुळे संजय दत्तच्या लेकीचं सात वर्ष जुनं नातं तुटलं

सोशल मीडियावर त्रिशालाचे जबरदस्त फॉलोअर्स देखील आहे. 

एका कारणामुळे संजय दत्तच्या लेकीचं सात वर्ष जुनं नातं तुटलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त झगमगच्या विश्वापासून दूर आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर त्रिशालाचे जबरदस्त फॉलोअर्स देखील आहे. त्रिशाला कायम तिच्या जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. यावेळीही असेच काहीसे घडले जेव्हा एका मजबुरीसाठी त्रिशालाला सात वर्ष जुनं नातं तोडावं लागलं. 

लाईव्ह सेशन दरम्यान एका युजरने तुझं कोणतं नातं दिर्घकाळ टिकलं पण तुला ब्रेकअप करावं लागलं? असा प्रश्न विचारला. यावर त्रिशाला म्हणाली, 'सात वर्ष मी एका रिलेशनशीपमध्ये होते.' ब्रेकअपचं कारण त्रिशालाने अगदी थोडक्यात सांगितलं. 'नातं का संपलं हे सविस्तर मी सांगणार नाही. फक्त एवढं सांगेल की वेगळं होण्याचा निर्णय आमच्या दोघांचा होता.'

ती पुढे म्हणाली, 'त्याला कुटुंब हवं होतं. त्याला लग्न हवं होतं. पण मी तेव्हा तयार नव्हाती. म्हणून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याचं लग्न झालं आहे. त्याचं कुटुंब देखील आहे आणि माझ्या शुभेच्छा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत.' असं त्रिशालाने सांगितलं. 

त्रिशाला सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या स्टायलिश लुकचे, बालपणीचे, कुटुंबियांसोबतचे, मित्रपरिवारासोबतचे फोटो शेअर करत असते. त्रिशाला, संजय दत्त आणि त्याची पहिली रिचा शर्माची मुलगी आहे. त्रिशालाने न्ययॉर्कमधून एलएलबी पदवी घेतली आहे. 

Read More