Govinda Son: बॉलिवूडमध्ये 90च्या दशकात एकाच अभिनेत्याची जादू होती. हा अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदाचा कॉमिक टायमिंगचे लोक आजही फॅन आहेत. तसंच, त्यांच्या अभिनयाचेदेखील चाहते आहेत. आता गोविंदाचा मुलगा यशवर्धन अहुजा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यशवर्धनच्या डेब्यूकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अलीकडेच गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनी एका मुलाखतीत मुलाचे भरभरून कौतुक केले आहे. तसंच, मुलाला एक सल्लादेखील दिला आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी मुलाच्या बॉलिवूड डेब्यूच्या तयारीबद्दल सांगितलं आहे.
सुनीता यांनी मुलाखतीत म्हटलं आहे की, यश स्वतःहूनच चांगली तयारी करत आहे. तो लवकरच मोठ्या पडद्यावर दिसेल. यश नेहमीच माझ्यासोबत याबद्दल चर्चा करतो. मम्मी हा विषय आणि ही कॉन्सेप्ट आहे. आम्ही याबाबत नेहमी बोलत असतो. मी त्याला एकच सल्ला दिला आहो तो म्बहणजे त्याच्या वडिलांना म्हणजेच गोविंदाला कॉपी करू नको, असंही सुनीताने म्हटलं आहे.
सुनीताने पुढे मुलाखतीत म्हटलं आहे की, मी त्याला म्हटलं आहे की, तुझ्या बाबांना गोविंदाला कॉपी करू नकोस. यश आणि गोविंदा दोघांच्याही इमेजची तुलना व्हावी, असं मला वाटत नाही. तुला स्वतःची वेगळी ओळख बनवायची आहे. यश गोविंदापेक्षाही अधिक नाव कमवेल, असं सुनीता यांनी म्हटलं आहे.
बॉलिवूडमध्ये डेब्यू करायच्या आधी यशवर्धन वरुण धवनच्या डिशूम आणि टायगर श्रॉफच्या बागी चित्रपटासाठी असिस्ट केले होते. आता तो राष्ट्रीय पुरस्कार विजेते सई राजेश यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात बाबिल खानदेखील दिसणार होता. मात्र आता त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळं या प्रोजेक्ट काही काळासाठी थांबला आहे.
गोविंदा यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे. राजा बाबू, कुली नं 1, साजन चले ससुराल, हिरो नं 1, अंटी नं 1, बडे मिया छोटे मिया हे चित्रपट लोकप्रिय ठरले होते. 2019मध्ये आलेल्या रंगीला राजा या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. पण बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉफ ठरला होता.