Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हानं नवऱ्याशिवाय साजरी केली पहिली होळी; झहीर ट्रोल होताच अभिनेत्री म्हणाली...

Sonakshi Sinha Troll : सोनाक्षी सिन्हानं लग्नानंतर पहिली होळी केली साजरी... नवऱ्याची अनुपस्थित पाहता नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हानं नवऱ्याशिवाय साजरी केली पहिली होळी; झहीर ट्रोल होताच अभिनेत्री म्हणाली...

Sonakshi Sinha Troll : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं यंदाची होळी आनंदानं आणि जल्लोषानं होळी साजरी केली. तिनं फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच फोटोंमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. आता यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर सोनाक्षी सिन्हानं सडेतोड उत्तर दिलं आहे. सोनाक्षीच्या लग्नानंतर ही तिची पहिली होळी होती. तिनं 23 जून 2024 मध्ये झहीर इकबालशी लग्न केलं. त्यांचं लग्न हे सिविल मॅरेज होतं. लग्नानंतर सोनाक्षीची ही पहिली होळी होती त्यामुळे ती तिच्यासाठी खूप स्पेशल होती. फोटोंमध्ये झहीर इकबाल कुठे दिसला नाही आणि सोनाक्षी ही एकटीच होळी खेळताना दिसली. 

सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एकटी होळी खेळताना दिसत आहे. तर तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला आणि तिचा नवरा झहीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी म्हटलं की त्यांची ही पहिली होळी आहे आणि तरी सुद्धा तो दिसत नाही आहे. तो का सोनाक्षीसोबत होळी खेळला नाही. तर हे पाहता सोनाक्षीनं त्याला सडेतोड उत्तर देत तिनं आणि झहीर इक्बालनं एकत्र होळी साजरी का केली नाही याविषयी सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांना पाहून तिनं कमेंट सेक्शनला लिमिट केलं, तरी सुद्धा ट्रोलर्स तिला ट्रोल करत राहिले. तर सोनाक्षीला सिन्हाला सहन झालं नाही आणि तिनं ट्रोलर्सला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देत लिहिलं की कमेंट्समध्ये थोडं रिलॅक्स करा. झहीर इकबाल मुंबईमध्ये आहे आणि मी शूटवर आहे. त्यामुळे आम्ही एकत्र नाही आहोत. डोक्यावर जरा थंड पाणी घाला. सोनाक्षीनं कमेंट करताना त्यावर झहीरनं देखील कमेंट केली आहे. त्यानं म्हटलं की 'मिसिंग यू बेबी'.

हेही वाचा : इरफान पठानच्या Wedding Anniversary ला आमिरची गर्लफ्रेंडसोबत हजेरी; Viral Video मध्ये स्पष्ट दिसतेय गौरी

सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये गुलालशी खेळतानाचे काही फोटो आहेत. हे फोटो शेअर करत सोनाक्षीनं कॅप्शन दिलं की रंग उधळा आणि आनंद साजरा करा. मित्रांनो 'जटाधारा' च्या शूटिंगवरून होळीच्या खूप खूप शुभेछ्चा. एकानं लिहिलं की 'मी दावा करू शकतो की झहीर या महिलेसोबत होळी खेळू शकत नाही. तुझे वडील तर तयार झाले पण नवरा नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'होळी का साजरी करतेस, रमजान साजरी कर.'

Read More