Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनाक्षीच्या 'कोका' सॉन्गची यूट्यूबवर धूम

गाण्याला यूट्यूबवर २ मिलियनहून अधिक व्ह्यूज

सोनाक्षीच्या 'कोका' सॉन्गची यूट्यूबवर धूम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगामी 'खानदानी शफाखाना' या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी एका डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटातील 'कोका' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

पंजाबी सिंगर जसबीर जस्सी यांनी गायलेल्या जुन्या 'कोका' गाण्याला 'खानदानी शफाखाना' या चित्रपटात रिक्रिएट करण्यात आलं आहे. 'खानदानी शफाखाना'मधील 'कोका' हे गाणं बादशाहने रिक्रिएट केलं असून, जसबीर जस्सीसह बादशाह आणि धवानी भानुशालीने यांनी गायलं आहे.

'कोका' गाण्याला यूट्यूबवर चांगली पसंती मिळत आहे. या गाण्यामध्ये सोनाक्षी पंजाबी गेटअपमध्ये दिसत आहे. या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबवर २ मिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. 

'खानदानी शफाखाना'मध्ये सोनाक्षी पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात सोनाक्षी बेबी बेदी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटात सोनाक्षीव्यतिरिक्त वरुण शर्मा, अन्नू कपूर, रॅपर बादशाह हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. 

Read More