Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी भाग्यवान आहे की...', सोनाक्षीवर माहेरच्यांपेक्षा सासरचे लोक करतात मुलीसारखं प्रेम

Sonakshi Sinha on In Laws : सोनाक्षी सिन्हानं एका व्हिडीओमध्ये माहेरच्या आणि सासरच्या लोकांविषयी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

'मी भाग्यवान आहे की...', सोनाक्षीवर माहेरच्यांपेक्षा सासरचे लोक करतात मुलीसारखं प्रेम

Sonakshi Sinha on In Laws : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल हे कपल नेहमीच चर्चेत असते. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्या दोघांचे यांनी लग्नानंतर पहिली ईद साजरी केली. एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात. आता युट्यूबवर आता तिनं लाइव्ह सेशन दरम्यान, वैवाहित आयुष्याविषयी बोलली आहे.

सोनाक्षी सिन्हानं यावेळी तिचं माहेर आणि सासरच्या घरच्यांमध्ये असलेल्या अंतराविषयी सांगितलं आहे. एका चाहत्यानं तिला माहेर आणि सासरमध्ये काय फरक आहे? त्यावर उत्तर देत सोनाक्षीनं सांगितलं की तिला घरी खूप प्रेम करतात. पण तिच्या सासरचे लोक मुलीसारखी वागणूक देतात आणि आणखी प्रेम करतात. त्यातून तिला वाटतं की ती आधीपासूनचं त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी सिन्हानं चाहत्याला उत्तर देत सांगितलं की 'एका मुलगी म्हणून माझ्या घरात मी अगदी आनंदानं प्रेमानं होती. पण माझ्या सासरच्या घरी ते मला मुली पेक्षा जास्त प्रेम करतात. मला वाटतं की मी खरंच भाग्यवान आहे की मला सासरं मिळालं आहे. कारण ते जबाबादर सारखं वागतात की कोणाची तरी मुलगी आपल्या घरी आली आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी थोडं जास्तच प्रेम करतात आणि  मी कायम याच कुटुंबाचा भाग होती अशी जाणीव करून देतात. जणू काही मी या घरातलीच आहे. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर झहीर इकबालनं मस्करीत म्हटलं, देवाचे आभार, ते खरोखर घडलेल नाही.'

हेही वाचा : सलमानचा चार्म संपला? Sikandar ने पहिल्या दिवशी किती कमावले पाहिलं का?

सोनाक्षीनं झहीरला हसत सांगितलं की 'अरे यार भावना समज. प्रत्येक गोष्टीत तर्क शोधण्याची गरज नाही. ही बोलण्याची एक पद्धत असते.' दोघांनी जून 2024 मध्ये लग्न केलं होतं. इंटरफेथ मॅरेज असल्यामुळे तिचे भाऊ या लग्नात सहभागी झाले नव्हते. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर लेकीला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. 

Read More