Marathi News> मनोरंजन
Advertisement

'खानदानी शफाखाना'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली; 'या'दिवशी होणार प्रदर्शित

'खानदानी शफाखाना'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

'खानदानी शफाखाना'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली; 'या'दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच एका डॉक्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु आता सोनाक्षीचं हे नवं रुप पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. २६ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'खानदानी शफाखाना'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'खानदानी शफाखाना'च्या रिलीज डेटचा खुलासा करण्यात आला आहे. चित्रपट आधीच्या तारखेच्या एक आठवडा उशिरा म्हणजेच २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी 'खानदानी शफाखाना' या कॉमेडी चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळाली होती. अनेकांनी चित्रपटात सोनाक्षीच्या भूमिकेलाही पसंती दर्शवली आहे. चित्रपटात सोनाक्षी बेबी बेदी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. 

Read More