Sonali Bendre Pregnancy : बॉलिवूडमध्ये स्वत: ची छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेचे लाखो चाहते आहेत. सोनाली ही नेहमीच चर्चेत असते. सोनाली नुकतीच फराह खानच्या युट्यूब व्लॉगमध्ये दिसली होती. यावेळी त्या दोघी अनेक गोष्टींवर चर्चा करत होत्या. त्यावेळी त्या दोघींनी कोणत्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं हे सोनालीच्या सासूला सांगत होते. सोनालीनं फराह खानसोबत बोलत असताना . 'चम चम करता है' या मराठी गाण्याच्या वेळेस ती प्रेग्नेंट होती हा खुलासा करत सांगितलं की तिला स्वत: ला याविषयी काही माहिती देखील नव्हती.
सोनालीनं 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शिक 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटात आयटम सॉन्गवर डान्स केला होता. या चित्रपटाची पटकथा अशी होती की एक पुरुष ज्याला महिलांच्या मनात काय आहे ते कळतं. अभिनेता संजय नार्वेकरांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर सोनालीनं 'छम छम करता है' या गाण्यावर डान्स केला होता. आजही या गाण्यावर प्रेक्षक नाचताना दिसतात. पण याच गाण्याचं शूटिंग करत असताना ती प्रेग्नंट होती आणि याविषयी तिला स्वत: ला काही माहित नव्हतं असा खुलासा तिनं केला आहे.
हेही वाचा : मराठमोळ्या Sonali Bendre चं आलिशान घर पाहिलंत का? फराह खानच्या व्लॉगमधून आलं समोर
दरम्यान, सोनालीनं 2002 मध्ये गोल्डी बहलसोबत लग्न केलं. 2005 मध्ये तिनं एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर सोनाली ही मोठ्या पडद्यापासून दूर गेली आणि काही वर्षानंतर रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून परतली.