Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' अभिनेत्रीचे पत्र वाचून कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनालीला रडू कोसळले!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याची खबर समोर आली. 

'या' अभिनेत्रीचे पत्र वाचून कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनालीला रडू कोसळले!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याची खबर समोर आली. खुद्द सोनालीनेच ट्वीट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. इरफान खानपाठोपाठ सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याच्या धक्क्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने सोनालीची न्यूयॉर्कमध्ये भेटही घेतली. सोनालीला भेटून अक्षय कुमार म्हणाला...

सोनालीच्या कॅन्सरबद्दल समजताच अनेक सेलिब्रेटींनी मुंबईतील तिच्या कुटुंबियांशी भेटही घेतली. पहा फोटोज...

आता संपूर्ण बॉलिवूड सोनालीच्या लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहे. सोनालीच्या आजारपणाबद्दल समजताच अभिनेत्री दिव्या दत्ताने तिच्यासाठी अत्यंत भावूक पत्र लिहिले. सोनाली बेंद्रे ही तिची या इंडस्ट्रीतील पहिली फ्रेंड असल्याचेही तिने म्हटले आहे. 

हे पत्र वाचताच सोनालीला रडू कोसळले. दिव्याला टॅग करत सोनालीने ट्वीट केले की, दिव्या तू मला रडवलंस. लव्ह यू. थॅंक्स. 

याशिवाय सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर तिच्यासाठी प्रार्थना शेअर केल्या.

 

अनुपम खेर यांनी केलेल्या ट्वीटवर सोनाली म्हणते, धन्यवाद. तुम्ही माझे शेजारी असलात तरी मी नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या देशात भेटत राहीली आहे. न्यूयॉर्कमध्येही लवकरच भेट होईल, अशी आशा आहे. 


याचबरोबर सोनालीने करण जोहर, रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, नेहा धूपिया, अर्जुन कपूर, मधुर भंडारकर, राजकुमार राव, श्रुती हासन, अभिषेक बच्चन, उमंग कुमार, अनिल कपूर, अदिति राव हैदरी, मनीषा कोईराला, आशुतोष गोवारिकर, फरहान अख्तर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फराह खान यांचे देखील आभार मानले. 

Read More