Marathi News> मनोरंजन
Advertisement

आक्रमक स्वरुपात 'कडक लक्ष्मी' देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

'भेटाया या देवाला, नवस केले खूप..., गाभाऱ्यात दिसलं रं आज खरं रुप',  आक्रमक सोनाली देवाकडे व्यक्त करतेय व्यथा  

आक्रमक स्वरुपात 'कडक लक्ष्मी' देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

मुंबई : 'तुला ठाव नाही तुझी किंमत किती, चल दाखव या दुनियेला हिम्मत किती... ' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं ‘कडक लक्ष्मी’ (Kadaklakshmi) गाणं नुकताचं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या नव्या गाण्याची चर्चा रंगत आहे. सोनालीने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत मुलींना प्रेरणा देण्यासाठी खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

‘कडक लक्ष्मी’ रुपातील स्वतःचा फोटो पोस्ट करत सोनालीने कॅप्शनमध्ये, 'पहिल्यांदाच सिनेमातल्या आपल्या पात्रासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली आणि ती देखील अश्या गाण्यासाठी….स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनातलं.. जेव्हा स्री कडकलक्ष्मी चं रूप घेते..' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनालीचा ‘कडक लक्ष्मी’ रुपातील हा आक्रमक रुप पाहिल्यानंतर प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरण आपसूक निर्माण होईल. गाणं स्वतः सोनालीने गायल्यामुळे तिच्या डान्समध्ये देखील राग आणि आक्रमकपणा दिसत आहे. 

दरम्यान, ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) सिनेमातील गाण्यांना संगीतप्रेमी उत्तम प्रतिसाद देत आहेत.  ‘कडक लक्ष्मी’गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. 

‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली कुलकर्णी शिवाय सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. 

Read More