Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रेसलेटप्रमाणे मंगळसूत्र घातल्यानंतर ट्रोल झाली सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच बिझनेसमॅन आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकली आहे. 

ब्रेसलेटप्रमाणे मंगळसूत्र घातल्यानंतर ट्रोल झाली सोनम कपूर

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच बिझनेसमॅन आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर काही दिवसातच सोनम 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनम कपूरने तिचं मंगळसूत्र हातात गुंडाळले होते. यावरून ती सोशल मीडियामध्ये ट्रोल झाली आहे. 

नेटकरांनी केलं ट्रोल  

सोनम कपूरने हातात मंगळसूत्र घातल्याने नेटकर्‍यांनी तिच्यावर भारतीय संस्कृती भ्रष्ट केल्याचा आरोप लावला आहे. एका चाहतीने सोनम कपूरला मंगळसूत्र घालणं ही जबरदस्ती नाही. पण तुमच्या साथीदाराचं प्रेम हृद्याजवळ रहावे याकरिता मंगळसूत्र गळयात घालण्याची प्रथा आहे. पण भारतीय संस्कृतीसोबत नेहमीच बॉलिवूड कलाकार छेडछाड करतात. त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये विदेशी गोष्टींची भेसळ होत आहे. 

fallbacks

वीरे दी वेडिंग हा चित्रपट लग्नसंस्थेशी निगडीत आहे. यामध्ये आजच्या पिढीतील तरूणींची कहाणी आणि लग्नाविषयी त्यांची मतं मांडण्यात आली आहेत. त्याचा आधार घेत एका व्यक्तीने 'सोनमने चित्रपटात आणि आता तिच्या खाजसी आयुष्यातही मंगळसुत्राचा अपमान केल्याचे म्हटले आहे. 

Read More