Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीपासून दूर सोनम कपूरची अवस्था वाईट; पाहा त्याच्या आठवणीत काय केलं

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही काळ तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांमुळे चर्चेत होती

पतीपासून दूर सोनम कपूरची अवस्था वाईट; पाहा त्याच्या आठवणीत काय केलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही काळ तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांमुळे चर्चेत होती, पण अभिनेत्रीने नुकतचं केलेलं फोटोशूट काही वेगळेच सांगत आहे. सोनम आणि आनंद आहुजा यांची तुलना इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कपलमध्ये केली जाते.

सोनम आपल्या पतीसोबत गेल्या एक वर्षापासून लंडनमध्ये राहत होती,  नुकतीच  ती बहीण रिया कपूरच्या लग्नासाठी मुंबईला पोहोचली होती. 14 ऑगस्टला तिच्या बहीणीच्या लग्नात  पती आनंद आहुजासोबत उपस्थित होती.

तेव्हापासून सोनम मुंबईत आहे पण आनंद आहुजा लंडनमध्ये परतला आहे. पतीची आठवण येत असल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये आनंदने सेमी-फॉर्मल आउटफिट परिधान केला आहे, तर सोनमने ब्लश गुलाबी ड्रेस परिधान केला आहे. सोनम आणि आनंद यांचं रोमँटिक स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्ट शेअर करत सोनमने कॅप्शनमध्ये लिहिलं की, मी तुला खूप मिस करत आहे, तुला भेटण्याची वाट पाहत आहे. या पत्नीच्या पोस्टला उत्तर देताना आनंद आहुजा यांनी लिहिलं की, "क्यूट, तू हॉट दिसत आहेस. आणि मी असा दिसत आहे की, माहित नाही काय करत आहे."

Read More