Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोनम म्हणते...

तिच्या वजनात देखील १० किलोंनी वाढ झाली आहे.

प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोनम म्हणते...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने गत वर्षी बॉयफ्रेंड आनंद आहूजा सोबत विवाह बंधनात अडकली. सध्या ती आगामी 'द झोया फॅक्टर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान तिच्या वजनात देखील १० किलोंनी वाढ झाली आहे. तिच्या प्रेग्नेन्सीच्या चर्चांना पुर्णविराम देत तिने महत्वाचा खुलासा केला आहे. 

fallbacks

आपल्या प्रेग्नेन्सीच्या अफवांवर खुलासा करताना ती म्हणाली की, 'आपल्या समाजात लग्न झाल्यानंतर लगेचच पुढचं पाऊल म्हणजे बाळ. ही गोष्ट खरी असली तरी देखील माझ्या आगामी चित्रपटासाठी वजन वाढवलं होतं. पण आता मी माझं ६ किलो वजन कमी देखील केलं आहे.' 

असं म्हणत तिने पसरणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे आपण गरोदर नसल्याचे देखील तिने यावेळेस सांगितले  आहे. 'द झोया फॅक्टर' चित्रपटाचं कथानक एका राजपूत मुलीभोवती फिरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

मुळात हिंदू पण, मुस्लिम धर्मातील नाव असणारी ही मुलगी आणि तिची कहाणी खऱ्या अर्थाने अतिशय मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. सोनमसोबत या चित्रपटातून मल्याळम अभिनेता दुलकर सलमान स्क्रीन शेअर करणार आहे. बॉलिवूडमध्ये हा त्याचा दुसरा चित्रपट आहे.

Read More