Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia Bhatt च्या गरोदरपणावर काय आहे आईच म्हणणं?

भट्ट आणि कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण... अभिनेत्रीच्या आईचा आनंद गगनात मावेनासा  

Alia Bhatt च्या गरोदरपणावर काय आहे आईच म्हणणं?

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर कपूर कुटुंबातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आलिया लवकरचं आई होणार आहे. खुद्द आलियाने सोनोग्राफी दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'लवकरचं आमचं बाळ येणार आहे...' असं लिहिलं आहे.  आलियाने आनंदाची बातमी दिल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. 

लग्नाच्या 2 महिन्यांनंतर आलिया गरोदर राहिल्यामुळे आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सोनी राजदान (Soni Razdan) यांनी आलियाचा फोटो इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. 

fallbacks

फोटो पोस्ट करत सोनी राजदान यांनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय नीतू कपूर यांच्यासोबत इन्स्टा स्टोरी शेअर करत त्यांनी प्रिय आजी नीतू कपूर आणि प्रिय आजी सोनी राजदान असं लिहिलं आहे, सध्या कपूर आणि बट्ट कुटुंबात आनंदाच वातावरण आहे. 

fallbacks

दरम्यान, 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर साधारण दुसऱ्याच महिन्यात आलियानं केलेली ही पोस्ट पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

 

Read More