Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनू कक्कडनं नेहा, टोनीशी तोडले सगळे संबंध; भावा-बहिणीबद्दल पोस्ट शेअर करत म्हणाली, 'खूप...'

Sonu Kakkar : सोनू कक्कडनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाऊ टोनी कक्कड आणि बहीण नेका कक्कडशी सगळे संबंध तोडल्याचे सांगितलं आहे. 

सोनू कक्कडनं नेहा, टोनीशी तोडले सगळे संबंध; भावा-बहिणीबद्दल पोस्ट शेअर करत म्हणाली, 'खूप...'

Sonu Kakkar : बॉलिवूड लोकप्रिय गायिका नेहा कक्कडच्या कुटुंबा संबंधातील एक माहिती समोर आली आहे. नेहाची बहीण सोनू कक्कडनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक मोठी घोषणा केली आहे. तिनं सांगितलं की आता ती बहीण नेहा आणि भाऊ टोनी कक्कडची बहीण नाही. तिनं तिच्या भावा-बहिणींशी सगळे संबंध तोडले आहेत. 

सोनूनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की तुम्हाला सगळ्यांना हे सांगताना मला खूप वाईट वाटतंय की मी आता दोन टॅलेन्टेड सुपरस्टार्स टोनी कक्कड आणि नेहा कक्कडची बहीण राहिली नाही. मी आता हा निर्णय घेतला आहे. भावनिकदृष्ट्या खूप वेदना सहन केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. तर आज हा निर्णय सांगताना मला खरंच खूप वाईट वाटतंय. 

fallbacks

सोनू कक्कडनं केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून चांगलीच व्हायरल झाली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की 'तुला खूप शुभेच्छा पण थोडं आश्चर्य झालं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'या मागचं कारण काय? असं का होतंय?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ओह, आशा आहे की लवकरच सगळं ठीक होईल.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पीआर असू शकतो. कक्कड हे त्यांच्या अशाच सवयीसाठी ओळखले जातात. एका काळात नेहानं देखील प्रेग्नंसीचं नाटक केलं होतं. हे कौटुंबिक वादातून घडलं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'टोनीशिवाय बहिणीला सूपरस्टार कोण बोलतं? तुम्ही कधी अंदाजही लावू शकत नाही की या कुंटूबासोबत काय होत असेल. हे त्यांच्या आगामी म्यूजिक अल्बमसाठी असलेला हा पीआर स्टंट देखील असू शकतो.' 

हेही वाचा : राज कपूर यांची धाकटी सून विकते लोणचं; 2 वर्षात घटस्फोट ते बिझनेसवूमन जाणून घ्या कोण आहे 'ती'?

सोनू कक्कडनं अमाल मलिकनं केलेल्या या धक्कादायक खुलास्यानंतर हा खुलासा केला आहे. अमाल मलिकनं त्याच्या आई-वडिलांसोबत सगळे नाती तोडली. सोनूचा 1979 ऋषिकेशमध्ये जन्म झाला. सोनूनं कोक स्टुडियोमध्ये परफॉर्मकेलं होतं आणि तिनं अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. दरम्यान, आता तिनं असं का केलं हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे.  

Read More