Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO: सोनू निगमचा 'शिव शंकरा' गाणे प्रदर्शित

 सोशल मीडियावर सोनूने हे गाणे चांगलेच लोकप्रिय होत आहे.

VIDEO: सोनू निगमचा 'शिव शंकरा' गाणे प्रदर्शित

मुंबई : आज देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आजच्या या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव-पार्वती विवाह संपन्न झाला हेता. महाशिवरात्रीला जनसामान्यांपासून ते मोठ्या स्टार्सपर्यंत महादेवाची अराधना केली जाते. महाशिवरात्री या सणाचे औचित्य साधत गायक सोनू निगम ने दोन दिवसांपूर्वी एक गाणे प्रदर्शित केले. 'शिव शंकरा' असे या गाण्याचे नाव आहे.

 

 

सोशल मीडियावर सोनूने हे गाणे चांगलेच लोकप्रिय होत आहे. सोनूने त्याच्या स्वत:च्या इन्स्टग्राम अकाउंटवरून 'शिव शंकरा' गाणे शेअर केले आहे. श्रेयस पुराणिक यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. बसंत चौधरी लिखीत गाणे सोनू निगमने गायले आहे. 'शिव शंकरा' गाण्याची शूटिंग नेपाळच्या पोखरा क्षेत्रात चित्रित करण्यात आले आहे. या भजनाला आतापर्यंत २.६ कोटी चाहत्यांनी पाहिले आहे.

Read More