Marathi News> मनोरंजन
Advertisement

Fathers day... सोनू सूदने मुलाला दिली महागडी कार गिफ्ट; किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

सोनूला महागड्या गाड्यांचं कलेक्शन करण्याचं वेड आहे. 

Fathers day... सोनू सूदने मुलाला दिली महागडी कार गिफ्ट; किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कायम चर्चेत असतो. गेल्या वर्षभरापासून कोरोना ग्रस्तांच्या मदतीला धावणार हा रियल हिरो आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.  सोनू सूदने 'फादर्स डे'चं औचित्य साधत मुलाला एक भव्य आणि महागडी कार दिली आहे. सोनूच्या मुलाचं नाव इशांत सूद असं आहे. सोनूने इशांतला काळया रंगाची 'मर्सेडीज मेबॅक जीएलएस ६००' ही महागडी कार भेट दिली आहे.  या कारची किंमत जवळपास 3 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार Mercedes Maybach GLS600 मागच्याच आठवड्यात भारतात लॉन्च झाली आहे. सोनूचा एक व्हिडिओ सध्यो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मुलांना टेस्ट ड्राइव्हला घेवून जाताना दिसत आहे. सोनूला महागड्या गाड्यांचं कलेक्शन करण्याचं वेड आहे. सोनूकडे ऑडी क्यू ७, मर्सेडीज बेंज एमएल क्लास आणि पार्श पानामेरा या कार्स आहेत.

Read More