Marathi News> मनोरंजन
Advertisement

भररस्त्यात आग लागलेल्या कारमधून अभिनेत्याने मारली उडी; थोडक्यात वाचला जीव

शहाणपण वापरून वाचवला जीव 

भररस्त्यात आग लागलेल्या कारमधून अभिनेत्याने मारली उडी; थोडक्यात वाचला जीव

मुंबई : कलाकार कायमच आपल्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. अनेकदा स्वतःच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डही ठेवले जातात. मात्र एवढं सगळं करूनही जेव्हा कलाकाराचा अपघात होतो तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते. काही दिवसांपूर्वी शबाना आजमी यांचा अुघात झाला त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. शबाना यांचा थोडक्यात जीव वाचला. अनेक कलाकारांनी अपघातात जीव गमावला तर काही कलाकार थोडक्यात बचावले. 

कलाकाराने वाचवला आपला जीव 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

काही कलाकारांनी अपघातात आपला जीव अगदी थोडक्यात वाचवला आहे. 2014 साली सोनू सूद ऑडी कार अपघातात थोडक्यात बचावले होते. जेव्हा सोनू सूद वेस्टर्न एक्सप्रेस वेवरून जात होते. तेव्हा त्यांच्या कारला अपघात झाला. तो सफेद रंगाची ऑडी क्यू 5 कार ने प्रवास करत होते. सोनू कोणत्या तरी कामानिमित्त प्रवास करत होते. 

जेव्हा कारला आग लागली तेव्हा सोनू घाबरला. कारचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न देखील केला. माज्ञ लॉक उघडतच नव्हतं. तेव्हा सोनू सूदने प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सोनूच गाडी चालवत होता.  शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागली. गाडीतून बाहेर पडल्यावर सोनू सूदने फायर ब्रिगेडला कॉल केला. फायर ब्रिगेड 15 मिनिटे लागली तोपर्यंत सोनूची संपूर्ण कार जळली होती. 

Read More