Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सूर्यवंशी' सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला.

'सूर्यवंशी' सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित


मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार लवकरच चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. नुकताच रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. अक्षय कुमार सिनेमात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक #Sooryavanshi या नावाने व्हायरल होत आहे. 'सूर्यवंशी' सिनेमा 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात दाखल होणार आहे.  

fallbacks

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. या पोस्ट मध्ये खिलाडी कुमारने पेलिसांचे कपडे घातले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'सूर्यवंशी' सिनेमाची शूटिंग एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण आणि रणवीर सिंग यांची एक झलक सुद्धा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. सध्या अक्षय त्याच्या बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाच्या कामामध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शूरवीर सैनिकांची कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत

१८९७ साली झालेल्या सारगढीच्या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शिख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांना झुंज दिली होती. या सिनेमाचे कथानक लढाईत सहभागी असलेले हवालदार ईशर सिंह यांच्या शौर्यावर आधारलेलं आहे. इतिहासातील सर्वात कठीण युद्धातील हे एक युद्ध होते. 
 
'केसरी' या सिनेमाच्या निमित्ताने खिलाडी कुमार शीख सैनिकांच्या तुकडीचा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. शीख सैनिकांच्या साहसाची गाथा सांगणारा हा 'केसरी' आता बॉक्स ऑफिसरवर दणक्यात कमाई करतो का, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read More