Marathi News> मनोरंजन
Advertisement

'स्टुडंट ऑफ दी ईयर 2'ची रिलीज डेट झाली जाहीर

टायगर श्रॉफच्या 'स्टुडंट ऑफ दी ईयर' या सिनेमाच्या सिक्वेलची रिलीज डेट जाहीर झाली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

'स्टुडंट ऑफ दी ईयर 2'ची रिलीज डेट झाली जाहीर

मुंबई : टायगर श्रॉफच्या 'स्टुडंट ऑफ दी ईयर' या सिनेमाच्या सिक्वेलची रिलीज डेट जाहीर झाली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

या सिनेमातील मुख्य नायिकांच्या नावाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करणार असल्याचे निर्मात करण जोहर याने स्पष्ट केलेय.

करणने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. 'स्टुडंट ऑफ दी ईयर 2' जगभरात 23 नोव्हेंबर 2018मध्ये प्रदर्शित होईल. दोन मुख्य अभिनेत्रींच्या नावाची घोषणा पुढील महिन्यात होईल. या सिनेमाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करणार आहे. फॉक्स स्टार हिंदी, अपूर्व मेहता, टायगर श्रॉफ. 

 

करण जोहरने दिग्दर्शित केलेला 'स्टुडंट ऑफ दी ईयर' हा सिनेमा 2012मध्ये रिलीज झाला होता. यात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे तीन नवे चेहरे होते.

या तिघांसाठी खास होता 'स्टुडंट ऑफ दी ईयर'

2012मध्ये रिलीज झालेला ही सिनेमा तीन अभिनेत्यासाठी खास ठरला होता. या सिनेमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करियरची सुरुवात केली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. करण जोहरने याची निर्मिती केली होती.

Read More