Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनयासाठी MBBS सोडणाऱ्या 'सूर्यवंशम' फेम अभिनेत्रीने असा गमावला जीव

काहींना यश मिळतं पण त्यांचं नशिब त्यांना साथ देत नाही. 

अभिनयासाठी MBBS सोडणाऱ्या  'सूर्यवंशम' फेम अभिनेत्रीने असा गमावला जीव

मुंबई : झगमगत्या विश्वात आपली एक खास ओळख निर्माण करण्यासाठी अनेक कलाकार येतात. काहींच्या स्वप्नांना पंख मिळतात, तर काहींच्या पदरी मात्र फक्त निराशा येते. तर काहींना यश मिळतं पण त्यांचं नशिब त्यांना साथ देत नाही. असे  कलाकार त्यांच्या चाहत्यांना निराश करून जगाचा अखेरचा निरोप घेतात. असचं काही घडलं आहे 'सूर्यवंशम' फेम अभिनेत्री सौंदर्यासोबत. सौंदर्यने प्रसिद्ध चित्रपट 'सूर्यवंशम'मध्ये मुख्य भूमीका साकारली होती. 

अभिनत्री सौंदर्याचा जन्म 18 जुलै 1972 साली कर्नाटकमध्ये झाला होता. सौंदर्याचे वडील कन्नड सिनेविश्वात लेखक होते. सौंदर्यायांनी वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेतले, पण अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी MBBS पूर्ण न करता. अभिनयाची वाट धरली. सौंदर्या यांनी 'गंधर्व' चित्रपटाच्या माध्यमातून  आपल्या करियरची सुरूवात केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by saga (@my_posts_my_wish)

या अभिनेत्रीने सर्वाधिक तेलुगू चित्रपटात काम केले. 100 चित्रपटांमध्ये सौंदर्या यांनी आपलं नाव कोरलं. आजही 'सूर्यवंशम' चित्रपटातील त्यांची भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. त्यामध्ये अभिनेते रजनीकांत, कमल हसन या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे. पण 'सूर्यवंशम' चित्रपटातील बिग बीसोबत त्यांची जोडी हिट ठरली. 

पण ही प्रसिद्धी त्यांना फार काळ अनूभवता आली नाही. एका विमान अपघातात त्यांचं निधन झालं. सौंदर्या त्यांच्या भावाला भेटायला बेंगळुरू ते करीमनगर जात होत्या. सौंदर्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होत्या. त्याचं वर्षी त्यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. अखेर 17 एप्रिल 2004 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या अपघातात त्यांच्या भावाचं देखील निधन झालं. 

Read More