Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या चाहत्यासाठी चिरंजीवी यांचा मोठा निर्णय

त्यांनी जे केलं आहे ते पाहून ....

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या चाहत्यासाठी चिरंजीवी यांचा मोठा निर्णय

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेते चिरंजीवी यांनी मागील कित्येक दशकं चाहत्यांना मनोरंजनाचा खजिना दिला आहे. चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या या अभिनेत्यानं सोबतच समाजाप्रतीही आपलं भान जपत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार चिरंजीवी यांनी त्यांच्या एका चाहत्यासाठी अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. 

कॅन्सरशी झुंजणाऱ्या एका चाहत्याच्या मदतीसाठी चिरंजीवी यांनी पुढाकार घेतला आहे. 

चाहत्याच्या उपचारांसाठी चिरंजीवी य़ांनी आर्थिक मदत देऊ केली. शिवाय त्याचे रिपोर्ट पाहून एका खासगी रुग्णालयात पुन्हा हे रिपोर्ट दाखवून घेण्यास सांगितलं. 

व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत चिरंजीवी यांनी या चाहत्य़ाची भेट घेतली. त्याची परिस्थिती जाणून घेतली. उपचारांसाठीचा खर्च उचलणंही त्याच्यासाठी कठीण असल्याचं लक्षात येताच त्यांनी हा भार उचलला. 

व्यंकट या चाहत्याला स्वत: काही रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला देत आपल्या टीमला त्यांना हवी ती सर्व मदत करण्यास सांगितलं. शिवाय या साऱ्यावर लक्षही ठेवण्यास सांगितलं. 

इतक्यावरच न थांबता व्यंकटला त्यांनी दोन लाख रुपये ताबडतोब खर्चासाठी दिले. चिरंजीवी यांनी दिलेली ही मदत पाहून आपण त्यांचे कायम ऋणी असू, अशी प्रतिक्रिया व्यंकटने दिली. 

Read More