Marathi News> मनोरंजन
Advertisement

तेलुगू अभिनेत्याच्या घरी चोरी, हिऱ्याचे दागिने आणि लाखोंची रोकड... CCTV मध्ये कैद दृष्य

South Actor's Home Got Robbed : तेलुगू अभिनेत्याच्या घरी चोरी, चक्क तिसऱ्या मजल्यावरून केली चोरानं एन्ट्री...

तेलुगू अभिनेत्याच्या घरी चोरी, हिऱ्याचे दागिने आणि लाखोंची रोकड... CCTV मध्ये कैद दृष्य

South Actor's Home Got Robbed : दाक्षिणात्य अभिनेता विश्वस सेन हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याच्या हैदराबादमध्ये असलेल्या त्याच्या घरी चोरी झाली आहे. एका चोरानं त्याच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या फिल्म नगरमध्ये 16 मार्च रोजी 'लैला' या चित्रपटातील अभिनेता विश्वक सेनच्या घरी चोरी झाली. विश्वक सेनच्या वडिलांनी त्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.

कथितपणे चोरानं विश्वक सेनच्या घरात तिसऱ्या मजल्यावर त्याच्या बहिणीचा बेडरूम आहे. त्या बेडरूममधून त्यानं घरात प्रवेश केला. ज्यावेळी चोरानं तिच्या रूममधून प्रवेश केला तेव्हा ती झोपलेली होती. ती जागी झाल्यानंतर तिनं पाहिलं की तिच्या रुममधल्या काही गोष्टी इथे तिथे पडल्या होत्या. इतकंच नाही तर तिच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तू देखील तिथून गायब झाल्या होत्या. तक्रारीनुसार, चोराने 2.2 लाख रुपयांची रोख आणि हिऱ्याचे दागिने चोरले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की चोराने घरात 20 मिनिटांपर्यंत वेळ घालवला आणि नंतर तिथून पळून गेला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishwak Sen (@vishwaksens)

या सगळ्या प्रसंगानंतर पोलिसांना ही शंका आहे की जो कोणी चोर आहे त्याला घराविषयी सगळी माहिती होती. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो घरात सहजतेने आणि अगदी काहीही चुकीचं न करताना जाताना दिसतोय. अगदी सहजपणे तो त्या घरात घुसला. दुसरीकडे आणखी काही बातम्या आहेत त्यात दिसून आलं की विश्वक सेननं 'लैला' या चित्रपटाच्या अपयशानंतर चर्चेत आला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप नकारात्मक प्रतिसाद मिळाला, प्रेक्षकांनी त्याच्या कथेत काही मज्जा नाही.

हेही वाचा : दाक्षिणात्य स्टार ममूटीला कॅन्सर? स्वतःच सांगितलं ब्रेक घेण्यामागचं कारण!

अभिनेता विश्वक सेननं विषयी बोलायचं झालं 'लैला' हा चित्रपट त्याच्या करिअरचा एक मोठा चित्रपट असेल असं म्हणत होते. पण त्याच्या खराब परफॉर्मन्सनंतर त्यानं सोशल मीडियावर माफी मागितली आणि एक चांगला प्रोजेक्ट घेऊन परत येण्याचं वचन दिलं. 'लैला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यावर, हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला पण त्याला प्रेक्षकांकडून काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

Read More