Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा

कलाविश्वापासून राजकारणापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील बड्या प्रस्थांची उपस्थिती 

PHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपंल वेगळं विश्व प्रस्थापित करणाऱ्या सुपरस्टार आणि 'थलैवा' म्हणून नावलौकिक असणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांच्या मुलीचा म्हणजेत सौंदर्या रजनीकांत हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. तमिळनाडूतील चेन्नईमध्ये असणाऱ्या हॉटेल लीला पॅलेस येथे सौंदर्या आणि अभिनेता, व्यावसायिक विशगन वनानगामुडी यांनी लग्नगाठ बांधली. चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या विविध कार्यक्रम, विधी आणि समारंभानंतर अखेर सौंदर्या आणि विशगन यांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचनं घेतली. 

कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. विाहसोहळ्यावेळी सौंदर्याने सुरेख अशी साडी नेसली होती. बिंदी, माथापट्टी असा एकंदर तिचा लूक होता. तर, विशगननेही दाक्षिणात्य लूकलाच प्राधान्य दिलं होतं. ज्यामध्ये आकाशी आणि सोनेरी अशी रंगसंगती असणारी लुंगी त्याने नेसली होती. त्यालाच शोभेसा शेलाही त्याने खांद्यावर घेतला होता. 

पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात खुद्द रजनीकांत, त्यांचा जावई अभिनेता धनुष यांनी पाहुण्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. राजकारण, कलाविश्व आणि व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील काही बड्या प्रस्थांनीसुद्धा या विवाहसोहळ्याला हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. ज्यामध्ये अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले कमल हसन, दिवंगत द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांच्या दोन्ही मुलांचा समावेश होता. त्याशिवाय दाक्षिणात्य कलाविश्वातील इतरही काही चेहरे या विवाहसोहळ्यादरम्यान पाहायला मिळाले.

fallbacks

fallbacks

सोशल मीडियावरही या लग्नसमारंभातील काही फोटो लगेचच पोस्ट करण्यात आले. खुदद् सौंदर्या आणि विशगन यांनीही लग्नगाठ बांधल्यानंतर माध्यमांसमोर येत सर्वांच्याच शुभेच्छांचा स्वीकार केला. लग्नसोहळ्यानंतर दोन स्वागतसोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये पहिल्या स्वागत सोहळ्याचं आयोजन हे सौंदर्याच्या आईकडून करण्यात येणार आहे. तर, दुसरा स्वागत सोहळा हा ऐश्वर्या हिच्याकडून आयोजित करण्याच येणार असल्याचं कळत आहे. 

Read More