Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा, Street Food ची चव चाखण्यासाठी अभिनेता जेव्हा रस्त्यावर उतरला

एक डोसा खाण्यासाठी स्टॉल मालकाला सुपरस्टारनं दिले इतके रुपये

पाहा, Street Food ची चव चाखण्यासाठी अभिनेता जेव्हा रस्त्यावर उतरला

हैदराबाद :  प्रवासाला निघालेलं असताना वाटेत भूक लागल्यानंतर मध्येच एखाद्या स्टॉलवर थांबण्याची अनेकांनाच सवय असते. अगदी सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. कायमच डाएट आणि तत्सम आहाराच्या सवयींचं नित्यनियमानं पालन करणारी ही मंडळी कधीकाळी त्यांच्या  आवडीच्या पदार्थांवर मजबूत ताब मारताना दिसतात.

सध्या अशाच एका सुपरस्टारनं आपल्या आवडीचा डोसा खाण्यासाठी म्हणून रस्स्त्यालगत असणाऱ्या एका डोसा स्टॉलपाशी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. 

जीभेचे चोचले पुरवण्यासाठी कारचा ताफा थांबवणारा हा अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन. 

'पुष्पा' या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाकरता अल्लू अर्जुन जात असताना आंध्र प्रदेशमध्ये असणाऱ्या एका डोसा स्टॉलवर थांबला. 

आपल्या लहानशा दुकानात डोसा खाण्यासाठी हा सुपरस्टार आल्याचं पाहून प्रथमत: मालकाला विश्वासच बसेना. त्यानंतर अल्लू अर्जुन जेव्हा डोसा खाल्ल्यानंतर पैसे देण्य़ासाठी पुढे गेला तेव्हाही या व्यक्तीनं पैसे घेण्यास नकार दिला. पण, तरीही अल्लू अर्जुननं आग्रह करत त्याला पैसे दिलेच. 

इतक्यावरच न थांबता डोसा स्टॉलच्या मालकाची आर्थिक परिस्थिती लक्षात आल्यानंतक अल्लू अर्जुननं त्याला हैदराबादमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. 

सूत्रांच्या माहितीनुसार डोसा खाल्ल्यानंतर त्यानं स्टॉल मालकाला 1000 रुपये दिले. हे पैसे घेण्यास मालकानं नकार दिला. पण, तरीही त्यानं पैसे दिलेच. एक अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनक जितका लोकप्रिय आहे, तितकंच तो या उदार स्वभावासाठीही ओळखला जातो. हा प्रसंग त्याचीच पोचपावती देत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Read More