Marathi News> मनोरंजन
Advertisement

चित्रपटांकडून वैद्यकीय क्षेत्राकडे का वळली ही अभिनेत्री?

पाहा ही अभिनेत्री आहे तरी कोण   

चित्रपटांकडून वैद्यकीय क्षेत्राकडे का वळली ही अभिनेत्री?

मुंबई : अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीसोबतच नव्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते. काहींना अशी संधी मिळते. पण, काहींना मात्र व्यग्र वेळापत्रकामुळं हे सारंकाही साध्य होत नाही. पण, तरीही काय झालं, हम भी किसीसे कम है क्या? असंच म्हणत ही कलाकार मंडळी यातूनही काही मार्ग काढतात. किंबहुना त्यांच्याकडे हे मार्ग चालतच येतात म्हणा ना. 

अशात प्रतिक्षेत असणाऱ्या अभिनेत्रीला काहीशी अशीच संधी मिळाली आणि तिनं त्या संधीचं सोनं करण्यासाठी पाऊल उचललं. कॅम्पस कॉमेडी ड्रामा या धाणीवर अवलंबून असणाऱ्या 'डॉक्टर जी' या चित्रपटातून अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिला आयुष्मान खुराना याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. 

चित्रपटात आपल्या वाट्याला आलेल्या डॉक्टर फातिमा या भूमिकेला न्याय देण्यासाठी रकुलनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनस्क्रीन डॉक्टर साकारण्यासाठी आणि वैद्यकीय संज्ञांचा अर्थ, महत्त्वं जाणून घेण्यासाठी तिनं वैद्यकिय शिक्षण घेण्याचं ठरवलं आहे. 

मुंबई : अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीसोबतच नव्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते. काहींना अशी संधी मिळते. पण, काहींना मात्र व्यग्र वेळापत्रकामुळं हे सारंकाही साध्य होत नाही. पण, तरीही काय झालं, हम भी किसीसे कम है क्या? असंच म्हणत ही कलाकार मंडळी यातूनही काही मार्ग काढतात. किंबहुना त्यांच्याकडे हे मार्ग चालतच येतात म्हणा ना. अशात प्रतिक्षेत असणाऱ्या अभिनेत्रीला काहीशी अशीच संधी मिळाली आणि तिनं त्या संधीचं सोनं करण्यासाठी पाऊल उचललं. कॅम्पस कॉमेडी ड्रामा या धाणीवर अवलंबून असणाऱ्या 'डॉक्टर जी' या चित्रपटातून अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिला आयुष्मान खुराना याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटात आपल्या वाट्याला आलेल्या डॉक्टर फातिमा या भूमिकेला न्याय देण्यासाठी रकुलनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनस्क्रीन डॉक्टर साकारण्यासाठी आणि वैद्यकीय संज्ञांचा अर्थ, महत्त्वं जाणून घेण्यासाठी तिनं वैद्यकिय शिक्षण घेण्याचं ठरवलं आहे. चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता अभिनयात खरेपणा आणण्यासाठी निर्मात्यांनी कलाकारांसाठी खास वर्ग आयोजित केल्याचं कळत आहे, जिथं या कलाकारांना वैद्यकिय शिक्षणातील काही खास बारकावे सविस्तर स्वरुपात सांगण्यात येतील. आपल्या वाट्याला आलेली ही भूमिका आणि त्यानिमित्त मिळालेले अनुभव हे सारंकाही संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया रकुलनं दिली. चित्रीकरणाच्या वेळी कलाकार वैद्यकिय साहित्य, परिस्थिती, प्रसंग या साऱ्याशी एकरुप असलेले दाखवण्यासाठी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली.

चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता अभिनयात खरेपणा आणण्यासाठी निर्मात्यांनी कलाकारांसाठी खास वर्ग आयोजित केल्याचं कळत आहे, जिथं या कलाकारांना वैद्यकिय शिक्षणातील काही खास बारकावे सविस्तर स्वरुपात सांगण्यात येतील. 

आपल्या वाट्याला आलेली ही भूमिका आणि त्यानिमित्त मिळालेले अनुभव हे सारंकाही संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया रकुलनं दिली. चित्रीकरणाच्या वेळी कलाकार वैद्यकिय साहित्य, परिस्थिती, प्रसंग या साऱ्याशी एकरुप असलेले दाखवण्यासाठी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली. 
 

Read More