Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीच्या पतीमध्ये कोरोनाची लक्षणं; रुग्णालयात गेले तर...

या विषाणूचा फटका कलाविश्वालाही बसल्याचं पाहायला मिळालं.

अभिनेत्रीच्या पतीमध्ये कोरोनाची लक्षणं; रुग्णालयात गेले तर...

बार्सिलोना : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात CoronaVirus कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. चीनपासून सुरु झालेल्या या व्हायरसने पाहता पाहता स्पेन, इटली, अमेरिका आणि भारत या देशांनाही विळखा घातला. या विषाणूचा फटका कलाविश्वालाही बसल्याचं पाहायला मिळालं. आता तर, म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीमध्येही कोरोनाची लक्षणं आढळून दिली आहेत. 

कोरोना असा नुसतं नाव जरी घेतलं तरी हल्ली अनेकांनाच भीती वाटू लागते. पण, या अभिनेत्रीच्या पतीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसूनही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना हीच माहिती देणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. 

श्रिया सध्या आणि तिचा पती Andrei Koscheev हे सध्या स्पेनमध्ये आहेत ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तिच्या पतीना कोरडा खोकला, ताप अशी लक्षणं दिसल्यामुळे त्यांनी बार्सिलोना येथील रुग्णालय गाठलं पण, तिच्या पतीला रुग्णआलयात दाखल करुन न घेता होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

'Andreiला ताप आणि कोरडा खोकला आला. तेव्हा आम्ही तातडीने रुग्णालयात गेलो. पण आम्हाला पाहून डॉक्टरांनी अतिशय सुरेखपणे आम्हाला तेथून जाण्याचा सल्ला दिला. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसेल तरी इथे राहिल्यावर तो होण्याची शक्यता आहे, असं खुद्द डॉक्टरांनीच आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही घरील विलगीकरणात राहण्याचा निर्णय़ घेत तेथेच उपचार घेतले. आम्ही दोघांनीही एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर पाळलं. मला समाधान आहे, की आता त्याची तब्येत सुधारली आहे', या शब्दांत तिने तिच्या मनातील भीती आणि दिलासा अशा भावना व्यक्त केल्या. 

 
 
 
 

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109) on

 

दाक्षिणात्य कलाविश्व आणि बॉलिवूडमध्येही नावारुपास आलेल्या श्रियाने कोरोना व्हायरसची दहशत अगदी जवळून पाहिली. किंबहुना या प्रसंगाना अतिशय धीराने सामोरं जात आता ती आणि तिचा पती दैनंदिन आयुष्यात परतत आहेत. त्यामुळे कोरोनाबाबच चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा या विषाणूवर मात करण्यासाठी समजुतदारपणे उचललेलं पाऊन कधीही फायद्याचं ठरणार आहे. 

Read More