Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिनेमासाठी श्रद्धा घेते विशेष मेहनत-सायना नेहवाल

सायना नेहनालच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमासाठी श्रद्धा विशेष मेहनत घेत आहे.

सिनेमासाठी श्रद्धा घेते विशेष मेहनत-सायना नेहवाल

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक तयार करण्याचे सत्र सुरु आहे. वर्षाच्या सुरवातीला माजी मुख्यमंत्री मनमोहन सिंग, मणिकर्णिका त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची शूटिंग सुरु आहे. उद्योगपति नारायण मुर्ती यांच्या जिवनावर आधारित सिनेमे लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॅटमिंटनपटू सायना नेहवालची यशोगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सायना नेहनालच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमासाठी श्रद्धा विशेष मेहनत घेत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहेत. सिनेमाची शूटिंग मागील वर्षी डिसेंबर महिन्यांपासून सुरू करण्यात आली.

'मी या सिनेमासाठी खूपच उत्साहित आहे. मला विश्वास आहे, श्रद्धा सिनेमाला योग्य न्याय देईल. ती सिनेमासाठी खूप मेहनत घेत आहे. सिनेमा कधी प्रदर्शित होतोय याची मी आतुरतेने वाट बघत आहे. पण सिनेमा तयार होण्यासाठी काही काळ आणखी लागणार असल्याचे वक्तव्य सायना नेहवालने केले आहे.
 

Read More