Marathi News> मनोरंजन
Advertisement

'21 वर्षानंतरही तू अजून...', राजमौली असं काही बोलले की जेनिलिया लाजली; हात जोडून म्हणाली 'तुम्ही...'; VIDEO व्हायरल

दिग्दर्शक राजामौली 'ज्युनिअर' चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात पोहोचले असता, जेनिलिया डिसुजाचं तोंडभरुन कौतुक केलं. 21 वर्षानंतरही जेनिलिया अजून तशीच दिसत असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. दोघांनी 'सई' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.   

'21 वर्षानंतरही तू अजून...', राजमौली असं काही बोलले की जेनिलिया लाजली; हात जोडून म्हणाली 'तुम्ही...'; VIDEO व्हायरल

अभिनेत्री जेनिलिया डिसुजा 'सितारे जमीन पर' नंतर आता ज्युनिअर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम नुकताच पार पडला. दिग्दर्शक एस एस राजामौली या कार्यक्रमात पोहोचले होते. यानिमित्ताने राजामौली आणि जेनिलिया यांची भेट झाली. यावेळी त्यांनी जेनिलिया 21 वर्षांनंतरही अगदी तशीच दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं. 21 वर्षानंतर झालेल्या त्यांच्या रियुनियनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांना 2004 मध्ये आलेल्या 'सई' चित्रपटाची आठवण करुन दिली आहे. 
 
मंचावरुन संबोधित करताना राजामौली यांनी जेनिलियाचं तोंडभरुन कौतुक केलं. "जेनिलिया तू जणू काही वेळेत फ्रीज झाली आहेस. किती वर्षं गेली, पण तू अजूनही तशीच दिसत आहेस. अजूनही तेच सौंदर्य, अदा. मी सिनेमॅटोग्राफर सेंथिलला विचारलं की, मला नवी जेनेलिया दिसणार आहे का? त्याने मला नक्की दिसेल असं आश्वासन दिलं आहे. मी आतुरतेने वाट पाहत आहे". 

राजामौली यांचे शब्द ऐकल्यानंतर जेनिलियादेखील आनंदाने उड्या मारु लागली होती. आपला आनंद व्यक्त करत तिने राजामौलींना म्हटलं की, "तुम्ही फार दयाळू आहात. तुमचे शब्द माझ्यासाठी फार मोलाचे आहेत".

दरम्यान राजामौली कार्यक्रमात पोहोचल्यानंतर जेनिलियासोबत झालेल्या भेटीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राजामौली तिच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळीच राजामौली यांनी तिचं कौतुक केलं होतं. 

राजामौली आणि जेनिलिया यांनी 2004 मध्ये 'सई' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या तेलुगू स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपटात नितीन, शशांक आणि प्रदीप रावत यांनीही प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार यशस्वी ठरला होता. 

ज्युनिअर चित्रपटाबद्दल

राधाकृष्ण रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात जेनेलिया देशमुख, श्रीलीला आणि किरीती रेड्डी मुख्य भूमिकेत आहेत, तर राव रमेश, व्ही. रविचंद्रन आणि अच्युत कुमार यांच्यासह इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 

Read More