Marathi News> मनोरंजन
Advertisement

SSR : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्तीला घेतलं ताब्यात

 मुंबई पोलीस देखील एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी तपास केला

SSR : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्तीला घेतलं ताब्यात

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीला देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या ऑफिसला एन सी बी  घेऊन निघाले. सकाळी सातपासून सॅम्युअलची मिरांडाच्या घरी चौकशी सुरू होती. मिरांडा सुशांत सिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर होता. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीमध्ये २० मिनिटं संवाद झाल्याचं समोर आलं आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी दाखल झाली होती. सुशांत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत एनसीबीचा तपास सुरू आहे. त्यासाठी पाच सदस्यीय टीम झाडाझडतीसाठी रियाच्या घरी दाखल झाली आहे. मुंबई पोलीस देखील एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी तपास करत आहेत. 

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचे ड्रग्ज तस्करांशी संबंध उघड झाले असूनरिया-शोविकचे ड्रग्जप्रकरणात व्हॉट्सऍप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहे. त्यामुळे या दृष्टीने झडती सुरू आहे. ड्रग्जप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. झैद, बासित, अब्बास आणि करण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

 दरम्यान, माझा सुशांतसिंह प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असा दावा कपिल झवेरीने केला आहे. अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणाचा तपास करत असताना अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या व्हाट्सएप चॅटमध्ये गोव्याचे हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याचा उल्लेख आला. त्यानंतर ईडीने गौरव आर्या याला समन्स बजावले. याच वेळी गौरव आर्यासोबत कपिल झवेरीचे नावही चर्चेत आले होते.

Read More