Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' फोटोग्राफरला हसण्याआधी फोटो नक्की बघा !

 या फोटोमध्ये फोटोग्राफर झाडावर उलटा राहून कपल फोटोशूट करत आहे. त्यामूळे या फोटोग्राफरची खिल्ली उडत आहे.

'या' फोटोग्राफरला हसण्याआधी फोटो नक्की बघा !

मुंबई : एखाद्या चांगल्या फोटोग्राफरकडून प्रिवेडींग फोटोशूट करुन घ्याव अस प्रत्येक कपलला वाटत असतं. कारण सध्याच्या जमान्यात प्रिवेडींग फोटोशूटलाही लग्ना इतकच महत्व प्राप्त झालय. मग अस फोटोशूट करण्यासाठी उत्तम स्थळ, उत्तम फोटोग्राफरची निवड केली जाते. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो काढले जातात. ही लग्नाची पूर्वतयारी असते. यातून लग्नाची वातावरण निर्मिती होत असते. असाच एक प्रिवेडींग फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये फोटोग्राफर झाडावर उलटा राहून कपल फोटोशूट करत आहे. त्यामूळे या फोटोग्राफरची खिल्ली उडत आहे.
fallbacks
असा एक व्हिडिओ एव्हाना सर्वांच्या मोबाईलमध्ये आला असेल. पण यानंतर त्या फोटोग्राफरच्या मोबाईलमधून निघालेला क्लिक फार कमी जणांनी पाहिला असेल. सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातमीनुसार हा प्रसंग केरळातील कोची या शहरातील आहे.व्हाईटरॅम्प फोटोग्राफीमार्फत लग्नाची फोटोग्राफी करण्यात आली होती. शाइज रोबर्ट आणि नव्या रोझ असे या कपल्सचे नाव असून विष्णू असे या फोटोग्राफरचे नाव आहे. विष्णूने काढलेला फोटो पाहून सर्वजण त्याचे कौतूक करत आहेत. (संबंधित बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याच्या सत्यतेची २४.तास.कॉम पुष्टी करत नाही)
Read More