Marathi News> मनोरंजन
Advertisement

रॅम्प वॉक करतोय भटका कुत्रा

प्रसिद्ध फॅशन डिझाईनर रोहित बलच्या फॉशन शोमध्ये भटक्या कुत्र्याने रॅम्प वॉक केले आहे.

 रॅम्प वॉक करतोय भटका कुत्रा

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काहीनाकाही व्हायरल होत असते. ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर २०१८ नु्कताच पार पडला. त्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला एक भटका कुत्रा. हा कुत्रा स्टेजवर भटकत असल्याचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल याने डिझाईन केलेली शेरवानी घालून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टेजवर वॉक करणार तेव्हाच एक भटका कुत्रा स्टेजवर पोहोचला. जमलेल्या प्रेक्षकांची यामुळे तारांबळ उडाली. त्यानंतर कुत्र्याला स्टेजवरून हाकलून लावण्यात आले. सिद्धार्थने वॉक करण्याआधी रॅम्प वॉकसाठी स्टेजवर भटक्या कुत्र्याची एन्ट्री झाली.

 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच एकापेक्षा अधिक सिनेमांच्या माध्यमातून दमदार एन्ट्री करणार आहे. त्याचा 'जबरिया जोडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत परिणीती चोप्रा झळकणार आहे. याशिवाय विक्रम बत्राच्या बायोपिकमध्येही त्याची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘मरजावां’सिनेमाही त्याच्या हातात आहे. करण जोहरच्या‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमा मार्फत त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले . 

Read More