Marathi News> मनोरंजन
Advertisement

Box Office : 100 करोडपर्यंत पोहोचला राजकुमारचा स्त्री

काय आहे कमाई 

Box Office : 100 करोडपर्यंत पोहोचला राजकुमारचा स्त्री

मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर सिनेमा 'स्त्री' होऊन आज 13 दिवस झाले आहेत. रिलीजच्या अगदी दुसऱ्या आठवड्यात स्त्री सिनेमाला हॉलिवूड सिनेमा "द नन' या सिनेमाने मोठी टक्कर दिली. याचा परिणाम स्त्रीच्या सिनेमावर झाला. मात्र आता असं दिसतय की, पुन्हा एकदा स्त्री हा सिनेमा आपला जोर कायम ठेवत आहे. कारण 13 दिवसांची कमाई समोर आली आहे. आतापर्यंत 91.77 करोड रुपयांची कमाई केली आहे. स्त्री या सिनेमाने वर्ल्डवाइड जवळपास 100 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

राजकुमार रावच्या या हॉरर कॉमेडि सिनेमाने आपल्या ओपनिंग डेच्या दिवशी शुक्रवारी 6.83 करोड रुपये कलेक्शव केलं आहे तर पहिल्या आठवड्यात 60.39 करोड रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात स्त्री या सिनेमाने शुक्रवारी 4.39 करोड रुपयांची कमाई केली तर शनिवारी तो आकडा 7.63 रुपये होता. रविवारी 9.88 करोड रुपये कमाई झाली तर सोमवारी 3.31 करोड रुपयांची कमाई असून मंगळवारी 3.22 करोड रुपये आणि बुधवारी 2.95 करोड रुपये कमाई केली आहे. 13 दिवसांत एकूण 91.77 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

स्त्री हा सिनेमा श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. श्रद्धा कपूरच्या "आशिकी 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 78 करोड रुपयांची कमाई केली आहे.

Read More