Marathi News> मनोरंजन
Advertisement

Street Dance 3D : 'मुकाबला' गाण्याचं रिमेक रिलीज

'मुकाबला' प्रभूदेवाचा खास परफॉर्मन्स 

Street Dance 3D : 'मुकाबला' गाण्याचं रिमेक रिलीज

मुंबई : आपल्या नृत्याने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारा अभिनेता प्रभूदेवा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 1994 साली रिलीज झालेल्या 'हमसे है मुकाबला' या सिनेमातील 'मुकाबला' या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे. वरूण धवनच्या Street Dance 3D मध्ये हे गाणं वापरण्यात आलं आहे. 

fallbacks

Street Dance 3 D मध्ये वरूण धवन आणि श्रद्धा कपूरसोबत प्रभूदेवा देखील आहे. या गाण्यातून पुन्हा एकदा प्रभूदेवाचा हटके जलवा पाहायला मिळणार आहे. 'मुकाबला' या गाण्याच्या ओरिजनल वर्जनमध्ये प्रभूदेवासोबत अभिनेत्री नगमा डान्स करताना दिसली होती. या रिमेकमध्ये वरूण, श्रद्धासोबत प्रभूदेवा देखील आहे. 

fallbacks

प्रभूदेवाचा डान्स हा अगदी सुरूवातीपासूनच लोकप्रिय आहे. आता त्याच्या या गाण्यात श्रद्धा आणि वरूण देखील चांगली साथ दिली आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ अतिशय पसंत आला असून या गाण्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आहे. 

'स्ट्रीट डान्स 3डी' हा सिनेमा 2013 साली आलेल्या 'एबीसीडी'चा तिसरा भाग आहे. याचा दुसरा भाग 2015 मध्ये आला होती. 'स्ट्रीट डान्स 3डी' मध्ये जुन्या कलाकारांसोबत लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीदेखील दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकप्रिय कोरिओग्राफर रेमो डिसोझाने केलं आहे. हा सिनेमा 24 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More