Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लिओनीला 'या' ठिकाणी जोरदार विरोध, पोस्टर-बॅनर फाडले आणि...

सनी लिओनीच्या कामाला 'या' ठिकाणी जोरदार विरोध  

सनी लिओनीला 'या' ठिकाणी जोरदार विरोध, पोस्टर-बॅनर फाडले आणि...

मुंबई : नववर्षानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सनी लिओनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर परफॉर्म करणार होती. सनी लिओनसाठी यावर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने पुडुचेरी येथे डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची हजारो तिकिटेही विकली गेली. मात्र कार्यक्रमापूर्वीचं अनेक संघटनांनी सनीच्या डान्स कार्यक्रमाला विरोध करण्यास सुरुवात केली.

पुडुचेरी सरकारने 3 दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी 45 प्रसिद्ध डान्स ग्रुप्सना सेलिब्रेशनसाठी बोलावले होते. आता या कार्यक्रमांना विरोध होत आहे. 30 डिसेंबर रोजी पुडुचेरीच्या बीच रोडवर अनेक संघटनांनी निदर्शने केली. यानंतर सनी लिओनीविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आणि पोस्टर्स, बॅनर फाडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

परिसरात सनी लिओनीच्या डान्सच्या कार्यक्रमाला संघटना विरोध करत आहेत. दरम्यान, सनी लिओनी तिच्या परफॉर्मन्ससाठी 30 डिसेंबरला पुडुचेरीला पोहोचली आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर फोटो शेअर करताना तिने सांगितले की तिने शहरातील एका रिअॅलिटी टीव्ही शोच्या सेटलाही भेट दिली होती. 

आता कोविड-19 च्या वाढते रुग्ण पाहता नवीन वर्षाच्या जल्लोषात ठिकठिकाणी कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आता सनी लिओनीचा शहरात शो होणार की नाही हे सांगणे कठीण आहे.

Read More