Marathi News> मनोरंजन
Advertisement

किंग'मधून शाहरुख खानचा अ‍ॅक्शन लूक; सुहाना करणार भव्य पदार्पण, शूटिंगची खास माहिती आली समोर

Shahrukh Khan King Movie News: किंग'च्या सेटवर शाहरुख खानने चित्रपटासाठी एका जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे शुटींग सुरू केले आहे. जाणून घेऊयात नेमकं काय असणार या सीनमध्ये आणि शाहरुख कोणती भूमिका साकारणार. 

किंग'मधून शाहरुख खानचा अ‍ॅक्शन लूक; सुहाना करणार भव्य पदार्पण, शूटिंगची खास माहिती आली समोर

Shahrukh Khan King Movie News: वयाच्या 59 व्या वर्षी देखील शाहरुख खान नवनवे चित्रपट घेऊन येत असतो. 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख 'किंग' चित्रपट घेऊन येत आहे. शाहरुख खान पुन्हा एकदा अ‍ॅक्शनच्या जगात आपली स्टाईल घेऊन नवे अंदाज दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पठाण' आणि 'जवान'सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर तो आता 'किंग' या आगामी सिनेमातून एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाची खास बाब म्हणजे यामधून त्याची मुलगी सुहाना खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे 'किंग' हा चित्रपट शाहरुखसाठी केवळ एक अ‍ॅक्शन सिनेमा नसून, वैयक्तिकदृष्ट्याही एक खास प्रोजेक्ट आहे.

सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या किंग या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. अलीकडेच वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये एक भव्य अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, या सीनसाठी परदेशी तुरुंगासारखे सेट तयार करण्यात आले आहे. या सीनमध्ये शाहरुख एका गुंडांच्या टोळीशी दोन हात करताना दिसणार आहे. हा सीन इतका महत्त्वाचा आहे की त्यासाठी तीन आंतरराष्ट्रीय स्टंट तज्ज्ञांना खास बोलावण्यात आले आहे. 15 जून रोजी जवळपास 200 स्टंट कलाकारांच्या उपस्थितीत हा अ‍ॅक्शन सीन शूट झाला.

हे ही वाचा: स्त्री 2'ला टक्कर देणार प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा? राजा साबमध्ये प्रेक्षकांना मिळणार जबरदस्त सरप्राइज, Teaser पाहाच

'पठाण' आणि 'जवान'सारख्या 1000 कोटींच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अ‍ॅक्शन सीन्स शाहरुखसाठी नवीन नाहीत. पण मिळालेल्या माहितीनुसार 'किंग'मध्ये तो एका मारेकरीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याने या चित्रपटाच्या आधीच अनेक आठवडे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. यावेळी त्याचा लूक अधिक रॉ आणि इन्टेन्स ठेवण्यात येणार आहे.

चित्रपटातील स्टंट्स हे याआधीच्या सिनेमांपेक्षा अधिक वेगळे, रिअ‍ॅलिस्टिक आणि थेट भिडणारे असतील. दिग्दर्शक सिद्धार्थ त्याला एका नव्या अ‍ॅक्शन अवतारात सादर करण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच अभिषेक बच्चनही या चित्रपटात एका भयानक खलनायकाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय चित्रपटात सुहाना खान, जयदीप अहलावत, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी, अभय वर्मा, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार देखील आहेत.

'किंग' या चित्रपटाची चर्चा आधीच निर्माण झाली असून, प्रेक्षक या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. सुहाना खानच्या पदार्पणाची आणि शाहरुखच्या नव्या अ‍ॅक्शन लूकची झलक लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read More