Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सुई धागा' च्या ट्रेलर लाँचवेळी अनुष्कावर आली अशी वेळ...

काय झालं असं?

'सुई धागा' च्या ट्रेलर लाँचवेळी अनुष्कावर आली अशी वेळ...

मुंबई : अगदी सिनेमा निवडण्यापासून ते अगदी ट्रेलर रिलीजपर्यंत यश राज बॅनरने हटके प्लान केले होते. ट्रेलर लाँचच्या वेळी देखील असाच हटके प्लान करण्यात आला. पण हा प्लान अनुष्का शर्माला चांगलाच महागात पडल्याच दिसलं. अनुष्काला Oops क्षणाला सामोरे जावे लागले. 

fallbacks

पण याचवेळी तिचा को स्टार अभिनेता वरूण धवन तिच्यासाठी धावून आला. अगदी जेंटलमॅन बनलेला वरूण धवन समोर आला. ट्रेलर लाँच वेळी स्टेजवर सगळीकडे वेगवेगळ्या रंगाचे धागे पसरवले होते. याच धाग्यांवर अनुष्काचे हिल अडकले. यावेळी चक्क खाली वाकून वरूण धवनने तिची मदत केली. तिच्या पायात अडकलेले सगळे धागे त्याने काढून टाकले. अनुष्का आपले स्टायलिश हिल या देसी अंदाजात झेलू शकली नाही.  

fallbacks

मात्र यावेळी वरूण धवनचा अंदाज पाहण्यासारखा होता... अगदी देसी 'मौजी' वरूण धवन या सिनेमात मौजी हे कॅरेक्टर प्ले करत आहे. अगदी नावाप्रमाणे तो मौजी असल्याचं दिसत आहे. 

fallbacks

वरूण धवन सिनेमात मौजीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. जो काहीच नसताना सगळं उत्तम आहे या विश्वासात राहत असतो. त्याची पत्नी ममता म्हणजे अनुष्का शर्मा यांच अरेंज मॅरेज आहे. हे दोघं एकमेकांचे नवरा बायको आहेत पण एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाही. 

fallbacks

fallbacks

 

Read More