Marathi News> मनोरंजन
Advertisement

भारतातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराचे Valentine Day सेलिब्रेशन! सुकेशने जेलमध्ये बसून जॅकलिनला गिफ्ट केलं प्रायव्हेट जेट

 सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.   'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला प्रायव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले आहे. 

भारतातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराचे Valentine Day सेलिब्रेशन! सुकेशने जेलमध्ये बसून जॅकलिनला गिफ्ट केलं प्रायव्हेट जेट

Sukesh Chandrashekhar Valentine Day : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो  'व्हॅलेंटाईन डे' मुळे. सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला 'व्हॅलेंटाईन डे' चे गिफ्ट म्हणून एक प्रायव्हेट जेट दिले आहे. या गिफ्टसह सुकेशने जॅकलीनला एक प्रेमपत्र देखील लिहीले आहे. प्रायव्हेट जेट गिफ्ट म्हणून का दिले याचे कारण देखील त्याने या पत्रात सांगितले आहे. 

आरोपी सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये 200 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. सुकेश चंद्रशेखर  भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा गुन्हेगार आहे. सुकेशने  'व्हॅलेंटाईन डे'  निमित्ताने  जॅकलीनला प्रायव्हेट जेट बेट म्हणून दिले आहे. या खाजगी जेटचे नाव जॅकलिनच्या नावाच्या आद्याक्षरांवरून म्हणजेच JF असे ठेवण्यात आले आहे. तसेच, त्याचा नोंदणी क्रमांक देखील जॅकलिनच्या जन्म महिन्यावरून घेतला आहे. हे पूर्णपणे कस्टमाइज्ड प्रायव्हेट जेट असल्याचा दावा सुकेशने केला आहे.

या प्रायव्हेट जेटसह पाठवलेल्या पत्रात सुकेशने जॅकलीनला  'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा दिल्या आहेत. तू तुझ्या कामासाठी आणि शूटिंगसाठी जगभर प्रवास करतेस. आता या जेटमुळे तुझा प्रवासाचा त्रास कमी होईल असे सुकेशने पत्रात म्हंटले आहे. तसेच सुकेशने या पत्रात जॅकलीनसाठी खास संदेश देखील दिला आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला   माझी फक्त एकच इच्छा आहे की जर माझा पुनर्जन्म झाला तर मी तुमचे हृदय बनू इच्छितो. कायम मी तुझ्या हृदयात धडधडत राहीन. माझी आई आणि मी या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहोत कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर व्यक्ती आहे असे त्याने पत्रात म्हंटले आहे. जॅकलीनला देत असलेल्या भेटवस्तूचा खर्च त्याच्या कर विवरणपत्रातून भरेल असा दावा सुकेशने त्याच्या पत्रात केला आहे.

जॅकलिन त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि दोघेही लग्नाची तयारी करत होते असा दावा सुकेशने केला आहे. सुकेशने जॅकलीनला अनेक कोट्यावधी रुपयांच्या महागड्या वस्ती गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. जॅकलिन एकेकाळी सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती असे तपासात समोर आले होते. यामुळे जॅकलीनची देखील चौकशी झाली. सुकेश हा फसवणूक करणारा आहे हे तिला माहित नव्हते असा जबाब जॅकलीनने पोलिस तपासात दिला आहे. 

हे देखील वाचा... जेलमध्ये बसून कमावले 22,41,00,00,000, स्वत:चे उत्पन्न जाहीर करणारा भारतातील सर्वात मोठा गुन्हेगार; नाव वाचुन थक्क व्हाल

Read More