Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुंदर पिचाईंना भावतो बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार!

गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे आगामी शो ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ यात दिसून येतील.

सुंदर पिचाईंना भावतो बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार!

मुंबई : गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे आगामी शो ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ यात दिसून येतील. टेलिव्हिजन चॅनल ‘स्टार प्लस’वर प्रसारित होणाऱ्या या शो चे होस्टिंग सुपरस्टार किंग खान करणार आहे. आगामी एपिसोडचि थिम ‘टुमॉरोज वर्ल्ड’ही असून त्यात पिचाई व्हिडिओच्या माध्यमातून सहभागी होतील.

पिचाई म्हणाले...

भारतीय वंशाचे असलेले पिचाई म्हणाले की, हिंदी चित्रपटांची लोकप्रियता विश्वस्तरावर आहे. सर्वच जण शाहरूखला ओळखतात. मी मात्र २०१४ मध्ये आलेल्या शाहरूखच्या हॅप्पी न्यू इयर या चित्रपटापासून ओळखू लागलो. आणि तो व त्याचे काम मला भावले.
त्याचबरोबर पिचाई म्हणाले की, भारतातील प्रत्येकाने स्मार्टफोनचा वापर करावा आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात रहावे.

‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’चा ‘टुमॉरोज वर्ल्ड’ हा एपिसोड रविवारी प्रदर्शित होईल.

Read More