Marathi News> मनोरंजन
Advertisement

Suniel Shetty कडून लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसोबतचा 'तो' फोटो शेअर

 हा फोटो शेअर करत त्यांने लिहिले आहे की,..

 Suniel Shetty कडून लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसोबतचा 'तो' फोटो शेअर

मुंबई : सुनिल शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी यांच्यासाठी 25 डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. या दिवशी दोघे एकत्र आले होते. ते लग्नाचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पत्नीवर खूप प्रेम करणाऱ्या सुनील शेट्टीने या खास प्रसंगी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर त्याची मुलगी अथिया शेट्टी आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत आहेत आणि या खास दिवसानिमित्त दोघांना शुभेच्छा देत आहेत.

सुनील शेट्टीने पत्नी माना शेट्टीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांने लिहिले आहे की, "तेव्हा सुंदर...अजूनही सुंदर...सदैव सुंदर...प्पी 30 th अॅनिवर्सरी वाईफ.."

खूप जुना फोटो

शेअर केलेल्या फोटोत सुनीलने काळ्या रंगाचा कोर्ट परिधान केलेला दिसत आहे आणि त्याची पत्नी माना सिलव्हर रंगाच्या कोर्टवर सुंदर दिसत आहे. एका सोहळ्यादरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे.

fallbacks

9 वर्ष रिलेशनशीप, अखेर लग्नाचा निर्णय

9 वर्षांच्या प्रदीर्घ नात्यानंतर सुनील शेट्टी आणि माना शेट्टीने 1991 मध्ये लग्न केले. आता दोघांच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.

fallbacks

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुनीलने माना हिच्यासोबत लग्न केले. दोघांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. असे म्हटले जाते की, सुनील शेट्टीने मानाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो तिच्या सौंदर्याने थक्क झाला होता.

Read More