Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sunil Grover घेवून येतोय नवा कॅमेडी शो; दर्शकांनो हासण्यासाठी व्हा सज्ज

 'द कपिल शर्मा शो'मध्ये सुनीलने गुलाटीच्या भूमिकेला योग्य न्याय दिलं. 

Sunil Grover घेवून येतोय नवा कॅमेडी शो; दर्शकांनो हासण्यासाठी व्हा सज्ज

मुंबई : टीव्ही विश्वातील विनोदवीर सुनील ग्रोवरने स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये सुनीलने गुलाटीच्या भूमिकेला योग्य तेवढं न्याय देत चाहत्यांच्या मनात घर केलं. कायम दर्शकांना पोट धरून हासवणाऱ्या सुनीलने आता देखील दर्शकांना हासवण्यासाठी एक मार्ग शोधून काढला. सांगायचं झालं तर सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान  घातलं आहे. कोरोना काळात सर्वांचे दुःख कमी करण्यासाठी Sunil Groverला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. 

सुनील लवकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी शो सुरू करत आहे. त्यामुळे आता घरातचं राहून आनंद लुटता येणार आहे. सुनीलचा हा कॉमेडी शो 30 एप्रिलपासून सुरू होणार असून 'लोल हंसे तो फसे...' असं नाव असणार आहे.  सुनीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. 

पोस्टमध्ये सुनील अत्यंत वेगळा आणि हटके दिसत आहे. सुनीलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय नेटकरी देखील सुनीलची ही पोस्ट शेअर करत आहेत. बॉलिवूड लाईफशी बोलताना सुनील म्हणाला... 'अशा कठीण प्रसंगी सकारात्मक राहणं आणि तुमच्या अवती-भोवती प्रत्येकजण सकारात्मक विचार करत आहेत का? आहे याची खात्री करुन घेणे फार महत्वाचे आहे.' 
 
सुनील पुढे म्हणाला, अशा परिस्थितीत कॉमेडी शो एक उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे दर्शकांना पोटधरून हासता येईल. सर्वांच्या चेहऱ्य़ावर हासू आणि आनंद हेचं आमचं ध्येय आहे. शोमध्ये कायम मी सर्वांना हासवण्याचा प्रयत्न करेलं. असं देखील सुनील म्हाणला. त्यामुळे सर्वांनी 30 एप्रिलपासून हासण्यात तयार राहा. 

Read More