Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकीकडे मुलीच्या लग्नाची तयारी..., अथियाच्या सप्तपदीची तयारी सोडून सुनील शेट्टी डेटवर?

जाणून घ्या सुनील शेट्टी कोणासोबत गेला डेटवर

एकीकडे मुलीच्या लग्नाची तयारी..., अथियाच्या सप्तपदीची तयारी सोडून सुनील शेट्टी डेटवर?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही लवकरच क्रिकेटर के एल राहुलसोबत लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा सुरु आहेत. या बातम्या सुरु असताना सुनील शेट्टी त्यांची पत्नी माना शेट्टीसोबत डेटवर गेले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेकदा सुनील शेट्टी आणि माना शेट्टी मुंबईत फिरताना दिसतात. पुन्हा एकदा हे दोघं मुंबईत दिसले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आणखी वाचा : Kriti Sanon 'बाहुबली' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याला करते डेट? 

सुनील शेट्टी आणि माना शेट्टी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी सुनील यांनी ऑलिव्ह रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर माना यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सुनील हे खऱ्या आयुष्यात खूप रोमॅन्टिक आहेत. सुनील शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच लग्न केलं होतं. त्यांचे फोटो सुनील शेट्टी फॅन क्लबनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी यांची प्रेमकहाणी पूर्णपणे वेगळी आहे. सुनील यांनी मानाला पहिल्यांदा पेस्ट्रीच्या दुकानात पाहिले. हे दुकान मुंबईतील नेपियन सी रोडवर आहे, जिथे सुनील अनेकदा त्यांच्या मित्रांना भेटायला जायचे. त्यादरम्यान त्याची नजर माना यांच्यावर पडली आणि एका नजरेत सुनील माना यांच्या प्रेमात पडले. 

Read More